Marathi News> मनोरंजन
Advertisement

सिद्धार्थच्या निधनानंतर शेहनाजने सांगितलं त्यांच्या नात्याचं सत्य

सिद्धार्थच्या निधनानंतर स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करणारी शेहनाज त्यांच्या नात्याबद्दल म्हणते...  

सिद्धार्थच्या निधनानंतर शेहनाजने सांगितलं त्यांच्या नात्याचं सत्य

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन होऊन 2 महिने झाले आहेत. तरी अद्यापही सिद्धार्थ आपल्यात नसल्याचं दुःख त्याचे चाहते पचवू शकलेले नाहीत. सिद्धार्थच्या निधनानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पण सिद्धार्तची गर्लफ्रेन्ड आणि अभिनेत्री शेहनाज गिल या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. दोघांची मैत्री बिग बॉसच्या घरात झाली. त्यानंतर या मैत्रीचं हळू-हळू प्रेमात रूपांतर झालं. दोघांना एकत्र पाहाण्यासाठी  त्यांच्ये चाहते आतुर असायचे. पण आता त्यांच्या चाहत्यांना सिद्धार्थ आणि शेहनाज कधीही एकत्र दिसणार नाहीत. 

दरम्यान, शेहनाजची एक मुलाखत तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती सिद्धार्थसोबत असलेल्या तिच्या रिलेशन आणि ब्रेकअपच्या अफवांबद्दल बोलत आहे. 'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत तिने त्यांच्या नात्याचं सत्य आणि ब्रेकअपबद्दल सांगितलं आहे. शेहनाज म्हणाली, 'मी ब्रेकअपच्या अफवा ऐकल्या होत्या. अनेक जण माझं ब्रेकअप झालं असं सांगत होते. पण माझं आणि सिद्धार्थचं ब्रेकअप कधी झालचं नाही...'

महत्त्वाचं म्हणजे, शेहनाज आता स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. सिद्धार्थच्या निधनानंतर शेहनाजचे दोन गाणे रिलीज झालं. एका गाण्याचं नाव 'हॅबिट' असं आहे. हे गाणं दोघांनी गोव्यात शूट केलं होतं. सिद्धार्थच्या निधनामुळे गाण्याचं शूट पूर्ण होवू शकलं नाही. त्यामुळे शेहनाजने गाण्याचं राहिलेलं काम पूर्ण केलं.

आयुष्यातील सर्वात जास्त खास व्यक्तीला गमावल्यानंतर शेहनाज पुन्हा मोठ्या धैर्याने कामावर परतली. अनेक दिवस ऐकटं राहील्यानंतर शाहनाजने सिद्धार्थ शुक्लाला श्रद्धांजली वाहात एक भावूक गाणं प्रदर्शित केलं आहे. गाण्याचं नाव  'Tu Yaheen Hai' असं आहे. आजही सिद्धार्थला मात्र शेहनाज विसरु शकलेली नाही. 

Read More