Marathi News> मनोरंजन
Advertisement

पतीच्या निधनानंतर अभिनेत्रीचा भावुक पोस्ट

वयाच्या ७८ वर्षी निधन  

पतीच्या निधनानंतर अभिनेत्रीचा भावुक पोस्ट

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री कृतिका देसाई (Kritika Desai)चे पती व बॉलिवूड दिग्गज अभिनेता इम्तियाज खान (Imtiaz Khan) यांच सोमवारी मुंबईत निधन झालं आहे. इम्तियाज खान ७८ वर्षांचे होते. इम्तियाज अभिनेता अमजद खान यांचे भाऊ आहेत. त्यांनी अभिनेत्री कृतिका देसाईशी लग्न केलं होतं. 'यादों की बारात,'प्यारा दोस्त' आणि 'नूरजहां' सारख्या सिनेमांमकरता इम्तियाज ओळखले जातात. 

इंस्टाग्रामवर लिहिली भावुक पोस्ट 

पतीच्या निधनानंतर कृतिका देसाईने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर भावुक पत्र लिहिलं आहे. त्यांनी इम्तियाज यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. 'मेरे दोस्त, मेरे फिलोसॉफर, गाइड आणि लवर.... अल्लाह हाफिज, हम जल्द ही दोबोरा मिलेंगे...'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

My friend, philosopher, guide and lover.....ALLAH HAFIZ....Till we meet again...soon.....

A post shared by Kruttika Desai (@kruttika_desai) on

इम्तियाज यांच्या निधनावर बॉलिवूडमधील अनेक दिग्गज व्यक्तींनी शोक व्यक्त केला आहे. ते एक उत्कृष्ठ अभिनेता आणि अद्भुत व्यक्ती होते. इम्तियाज यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९४२ पेशावरमध्ये झाला होता. त्यांनी मनोरंजन जगतात प्रवेश केला आहे. त्यांनी आपलं नाव जकरियन खानवरून इम्तियाज खान असं केलं. 

Read More