Marathi News> मनोरंजन
Advertisement

अरबाजपासून विभक्त झाल्यानंतर दोन वर्षांनी मलायकानी उचललं हे पाऊल...

मलाईका अरोरा आणि अरबाज खान हे २०१६ साली एकमेकांपासून वेगळे झाले होते

अरबाजपासून विभक्त झाल्यानंतर दोन वर्षांनी मलायकानी उचललं हे पाऊल...

मुंबई : आत्तापर्यंत बॉलिवूड अभिनेत्री मलाईका अरोरा-खान या नावानं ओळखल्या जाणाऱ्या मलायकानं आपल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी एक महत्त्वाचं पाऊल उचललंय. मलायकानं आपल्या नावातून 'खान' हे आडनाव काढून टाकलंय. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आत्तापर्यंत मलाईकाचं नाव मलाईका अरोरा-खान 

असं होतं... पती अरबाजपासून विभक्त झाल्यानंतरही तिनं या नावात बदल केला नव्हता... परंतु, आता मात्र मलाईकानं आपल्या नावातून 'खान' हे आडनाव काढून टाकलंय. 

fallbacks
मलाईका अरोरा 

 

खरं तर मलाईका आणि अर्जुन कपूर यांच्या नात्यांच्या चर्चेमुळे मलाईकाच्या फॅन्सना याचं आश्चर्य वाटणार नाही... परंतु, एकप्रकारे मलाईका अर्जुनसोबत असलेलं नातं पुढे घेऊन जाण्याच्या तयारीत दिसतेय, असं दिसतंय. 

मलाईका अरोरा आणि अरबाज खान हे २०१६ साली एकमेकांपासून वेगळे झाले होते... त्यानंतर मे २०१७ मध्ये त्यांचा परस्परसंमतीनं कायदेशीररित्या घटस्फोट झाला होता. 

नुकतंच, डेटिंगविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मलाईकानं म्हटलं होतं, मी या सर्व गोष्टींसाठी नवीन आहे. कारण मी कधीच डेटिंग केली नाही. मी ज्या व्यक्तीसोबत डेटिंग केली त्याच्याचसोबत विवाह केला.

fallbacks
मलाईका अरोरा 

 

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'कॉफी विथ करण'मध्ये अर्जुन कपूरनंही मलाईकासोबत असलेल्या नात्यावरून मौन सोडलं होतं. आता मी सिंगल नाही, असं अर्जुननं म्हटलं होतं. 

मलाईका आणि अरबाज खान यांना अरहान हा एक मुलगाही आहे. मलाईका सध्या रिअॅलिटी शो 'इंडियाज गॉट टॅलेंट'मध्ये जज म्हणून दिसतेय. 

Read More