Marathi News> मनोरंजन
Advertisement

IVF मध्ये सततच्या अपयशानं खचलेल्या अभिनेत्रीला आणखी एक धक्का; गंभीर आजाराचं निदान

अडचणींचा डोंगरच तिच्यावर कोसळला...   

IVF मध्ये सततच्या अपयशानं खचलेल्या अभिनेत्रीला आणखी एक धक्का; गंभीर आजाराचं निदान

मुंबई : आयव्हीएफसाठी सतत प्रयत्न करुनही अपयशाला सामोरी जाणारी अभिनेत्री आता परिस्थितीपुढे हात टेकताना दिसत आहे. बाळ होण्यासाठीच्या प्रयत्नांकरता सततची औषधं, वेदना, मानसिक आरोग्यावर होणारे आघात या साऱ्यातूनही ती अभिनेत्री सावरण्याचा प्रयत्न करत होती. (after unsuccessful  ivf Actress sambhavna seth suffring from rheumatoid arthritis)

संकटं काही तिची पाठ सोडताना दिसत नाहीयेत. ही अभिनेत्री आहे, संभावना सेठ. युट्यूब व्लॉग्सच्या माध्यमातून संभावना चाहत्यांच्या भेटीला येत असते. आपल्या दैनंदिन आयुष्यातील बऱ्याच घडामोडी ती या व्हिडीओंच्या माध्यमातून सर्वांपर्यंत आणताना दिसते. 

हे सर्वकाही सुरु असतानाच गेल्या काही दिवसांपासून या अभिनेत्रीची तिच्या वाढलेल्या वजनामुळे खिल्ली उडवली जात आहे. पण, हे सर्व नेमकं का होतंय हे जाणून संभावनाची थट्टा करणारेही चिंतातूर होतील. 

रूमेटाइड अर्थरायटिस नावाच्या गंभीर आजाराचा सामना आपण करत असल्याचा खुलासा नुकताच संभावनानं केला. जवळपास तीन वेळा आयव्हीएफ अपयशी ठरल्यामुळं वर्षभरानंतर पुन्हा अर्थरायटिसचा आजार सतावू लागल्याचं ती व्हिडीओमध्ये म्हणताना दिसते. 

संभावनाचं आजारपण इतकं गंभीर आहे, की तिला हालचाल करण्यातही अडचणी येत आहेत. हातपाय सुजणं, दुखणं, आखडणं असा त्रास तिला होत आहे. एका महिलेच्या शरीरात जेव्हा हे बदल होऊ लागतात तेव्हा त्याचे परिणाम गर्भधारणेवरही दिसून येतात. 

संभावनाही सध्या अशाच बिकट परिस्थितीतून जात आहे. आपल्या आजारपणामुळे पतीलाही प्रचंड त्रास होत असल्याचं दु:खही तिनं व्यक्त केलं. 

Read More