Marathi News> मनोरंजन
Advertisement

रोहित शर्माने अनफॉलो केल्यानंतर अनुष्काची पोस्ट

रोहितने विराटलाही सोशल मीडियावर अनफॉलो केलं आहे.

रोहित शर्माने अनफॉलो केल्यानंतर अनुष्काची पोस्ट

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने, विराट कोहलीला सोशल मीडियावर अनफॉलो केलं. त्यानंतर रोहितने आता बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मालाही अनफॉलो केल्याचं समजतंय. रोहितने अनफॉलो केल्यानंतर अनुष्काने सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे. 

या पोस्टमध्ये अनुष्काने, 'चुकीच्या गोष्टींमध्ये केवळ सत्यच शांततेशी हात मिळवू शकते' अशा आशयाची एक इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली. 

fallbacks

वर्ल्ड कपनंतर भारतीय संघात मतभेत सुरु असल्याच्या चर्चा आहेत. मतभेद सुरु असण्याच्या दरम्यानच रोहित शर्माने विराटला अनफॉलो केलं. मात्र आता अनुष्कालाही अनफॉलो केल्यानंतर त्याच्या उत्तरादाखल तिने ही पोस्ट लिहिली असल्याचं बोललं जात आहे. 

रोहितने विराट आणि अनुष्काला अनफॉलो केलं. मात्र विराट अजूनही रोहित आणि त्याची पत्नी रितिका सजदेहला सोशल मीडियावर फॉलो करतोय. 

Read More