Marathi News> मनोरंजन
Advertisement

जान्हवीचे 'धडक'मधील काही सीन्स पाहुन श्रीदेवी म्हणाल्या होत्या....

धडकच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या श्रीदेवींना जान्हवीच्या अभिनयाबद्दल काय वाटतं होतं?

जान्हवीचे 'धडक'मधील काही सीन्स पाहुन श्रीदेवी म्हणाल्या होत्या....

मुंबई : श्रीदेवींनी अचानक घेतलेल्या एक्सिटनंतर आता त्यांची मुलगी जान्हवी कपूर आपला जलवा दाखवण्यासाठी तयार झाली आहे. जान्हवीचा पहिलावहीला बॉलिवूड सिनेमा धडक लवकरच प्रदर्शित होणार आहे. अलिकडेच त्या सिनेमातील झिंगाट गाणे रसिकांच्या भेटीला आले. त्यानंतर जान्हवीचे वडील बोनी कपूर यांनी एका मुलाखतीत म्हटले की, जान्हवी कपूर अभिनयात कोणालाही कॉपी करत नाही तिची स्वतःची अशी खास स्टाईल आहे.

बोनी कपूर म्हणतात...

पुढे ते म्हणाले की, श्रीदेवीने 'धडक'च्या शूटिंगदरम्यान काही सीन्स पाहिले होते. ते पाहुन श्रीदेवी खूप खुश होती आणि तेव्हापासूनच जान्हवीत अभिनयाची एक युनिक स्टाईल असल्याचे तिचे म्हणणे होते. जान्हवीच्या या सिनेमाबद्दल श्रीदेवी खूप उत्सुक होती. या सिनेमाच्या प्रदर्शनाची ती आतुरतेने वाट पाहत होती. पण सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच ती आपल्यापासून खूप लांब गेली, हे अत्यंत खेदकारक आहे. 

fallbacks

ही आहे जान्हवीची स्टाईल आयकॉन

जान्हवी अभिनयात आई श्रीदेवीला फॉलो करत नसली तरी फॅशन आणि स्टाईलच्या बाबतीत ती आईलाच आदर्श मानते. याचा खुलासा खुद्द जान्हवीने एका कार्यक्रमात केला होता. ती म्हणाली होती की, श्रीदेवींची स्टाईल बॉलिवूडमध्ये सगळ्यात हटके आहे. म्हणून माझी स्टाईल आयकॉन तिचं आहे. 

 

M

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

२० जुलैला प्रदर्शित

धडक हा सुपरहिट मराठी सिनेमा सैराटचा हिंदी रिमेक आहे. यात जान्हवी कपूरसोबत ईशान खट्टर झळकणार आहे. हा सिनेमा २० जुलैला प्रदर्शित होईल. 

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

Read More