Marathi News> मनोरंजन
Advertisement

घरातल्या महत्वाच्या व्यक्तीच्या बर्थडेला ऐश्वर्या-अभिषेकची गैरहजेरी; पुन्हा एकदा वादाच्या चर्चांना जोर

 बच्चन कुटूंबातील जोडी अभिषेक ऐश्वर्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या जोडीच्या विभक्त होण्याच्या चर्चा सुरु आहेत. 

घरातल्या महत्वाच्या व्यक्तीच्या बर्थडेला ऐश्वर्या-अभिषेकची गैरहजेरी; पुन्हा एकदा वादाच्या चर्चांना जोर

मुंबई : बच्चन कुटूंब हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. कधी अमिताभ बच्चन त्यांच्या आरोग्यामुळे चर्चेत असतात. तर कधी जया बच्चन त्यांच्या पापाराझींना दिलेल्या रिएक्शनमुळे चर्चेत असतात. तर कधी अभिषेक-ऐश्वर्या त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. तर कधी आराध्या तिच्या चेंज होणाऱ्या लूकमुळे सतत चर्चेत असते. आता बच्चन कुटूंबातील जोडी अभिषेक ऐश्वर्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या जोडीच्या विभक्त होण्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र अनेकदा या जोडीनेच या सगळ्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. मात्र सध्या पुन्हा एकदा या चर्चांनी जोर धरला आहे आणि यामागचं कारण म्हणजे श्वेता बच्चनच्या वाढदिवसाला या जोडीची गैरहजेरी.

अमिताभ बच्चन आणि जया बच्चनची लेक श्वेता बच्चनने 17 मार्चला तिचा ५० वा वाढदिवस साजरा केला आहे. यानिमीत्ताने सगळीकडूनच श्वेतावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. प्रत्येकाने आप-आपल्या स्टाईलमध्ये विश केलं आहे. त्याच संध्याकाळी बच्चन परिवाराने तिच्या लेकीसाठी पार्टी ठेवली होती. 

नव्या नंदाचा रूमर्ड बॉयफ्रेंड सिद्धांत
रविवारी संध्याकाळी बच्चन परिवाराच्या सदस्यांच्या एका भव्य पार्टीची तयारी करताना पाहिलं गेलं. करण जौहर नव्या नवेलीला डेकोरेशनमध्ये मदत करताना दिसला. श्वेता बच्चनच्या बर्थडे पार्टीत नव्या नंदाचा रुमर्ड बॉयफ्रेंड सिद्धांत चतुर्वेदीदेखील दिसला. यावेळी सिद्धांत शर्ट आणि डोक्यावर टोपी परिधान करताना दिसला.

मुलीच्या बर्थडे पार्टीत जया बच्चन आणि अमिताभ बच्चनदेखील सहभागी झाले होते. फोटोत पाहिलं जाऊ शकतं की, दोघंही गाडीत बसलेले दिसत आहेत. श्वेता बच्चनच्या पार्टीत करण जौहर सहभागी नाही झाला असं होवू नाही शकत. करण आणि बच्चन परिवारचं नातं खूपच खास आहे. अशामध्ये करण आपल्या मित्राच्या पार्टीत खूपच कलरफूल अंदाजात दिसला. शाहरुख खानची पत्नी गौरी खान आणि मुलगी सुहाना खानदेखील पार्टीमध्ये सहभागी झाली होती. मात्र पापाराझींना पाहून गौरी तोंड लपवू लागली.  तर दुसरीकडे सुहानाने पापाराझींना गोड स्माईल दिली. सोशल मीडियावर युजर्सचं म्हणणं आहे की, बहिणीच्या बर्थडे पार्टीत भाऊ अभिषेक बच्चन वहिनी ऐश्वर्या राय बच्चन आणि  त्यांची मुलगी आराध्या बच्चन सहभागी झाले नव्हते. मात्र अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. 

Read More