Marathi News> मनोरंजन
Advertisement

Aishwarya Divorce Confirm: अखेर ऐश्वर्या - धनुषच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब, कोर्टाची कारवाई पूर्ण

दोन वर्ष वेगळं राहिल्यानंतर ऐश्वर्याचा घटस्फोट निश्चित झाला आहे. 27 नोव्हेंबर रोजी फॅमिली कोर्टाने यावर आपला निर्णय देऊन घटस्फोटाला मंजुरी दिली आहे. 

Aishwarya Divorce Confirm: अखेर ऐश्वर्या - धनुषच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब, कोर्टाची कारवाई पूर्ण

साऊथमधील लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक धनुष गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नयनतारासोबतच्या वादा पाठोपाठ धनुष आता आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांच्यातील घटस्फोट निश्चित झाला आहे. दोन वर्षांपूर्वी एकमेकांपासून वेगळा राहण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आता चेन्नई फॅमिली वेलफेअर कोर्टाने त्यांच्या घटस्फोटाच्या अर्जाला मंजुरी दिली आहे. 27 नोव्हेंबर 2024 रोजी दोघेही 18 वर्षांच्या संसारापासून ऑफिशिअल वेगळे झाले आहेत. 

धनुष आणि ऐश्वर्या 21 नोव्हेंबर रोजी चेन्नईतील फॅमिली कोर्टात आले होते. जेथे दोघांनी वेगळं होण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर दोघांच्या घटस्फोटाची सुनावणी 27 नोव्हेंबरपर्यंत स्थगित केली होती. 

2022 रोजीच केली होती घोषणा 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dhanush (@dhanushkraja)

धनुष आणि ऐश्वर्याने 2022 रोजीच वेगळे होण्याची घोषणा केली होती. धनुषने सोशल मीडियावर लिहिलं होतं की, आम्ही 18 वर्षांपर्यंत मैत्री, जोडीदार, पालक आणि एकमेकांचे शुभचिंतक म्हणून एकत्र खूप वर्षांचा प्रवास एकत्र केला. आज आम्ही ज्या ठिकाणी उभे आहोत तिथून आमचे रस्ते वेगळे झाले आहेत. मी आणि ऐश्वर्याने एक जोडप म्हणून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. स्वतःला आणखी चांगल ओळखण्यासाठी आम्ही एकमेकांना वेळ देत आहोत. आमच्या निर्णयाचा सन्मान करा आणि खासगी आयुष्याची काळजी घ्या. 

2004 साली धनुष आणि ऐश्वर्याने चेन्नईत एक शाही विवाह सोहळा केला होता. 18 वर्षांनंतर या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघंही मुलं यात्रा आणि लिंगा यांच्यासाठी को पॅरेंटिंग करणार आहेत. 

धनुष आणि ऐश्वर्याची लव्हस्टोरी 

धनुष आणि ऐश्वर्या यांची लव्हस्टोरी एका सिनेमाच्या प्रमोशनातून सुरु झाली. धनुषचा सिनेमा 'कोंडल कोंडन' च्या प्रमोशनमध्ये ऐश्वर्या सहभागी झाली होती. ऐश्वर्याला सिनेमातील धनुष्यची भूमिका इतकी आवडली की, तिने दुसऱ्या दिवशी त्याला फुलांचा बुके पाठवला. या छोट्याशा कृतीनंतर या दोघांमध्ये एक चांगलीच मैत्री झाली आणि मग मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांनी 2004 साली लग्न केलं. सुखी संसार आणि दोन मुलांना जन्म देऊन 18 वर्षांचा संसार केला. यानंतर या दोघांनी आता घटस्फोट केला आहे.  

धनुषबद्दल बोलायचं झालं तर यावेळी तो पुन्हा एकदा कायद्याच्या कारवाईमुळे चर्चेत आले आहेत. अभिनेत्री नयनतारा आणि तिचा पती दिग्दर्शक विघ्नेश शिवा यांच्या विरोधात मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. नेटफ्लिक्सवरील डॉक्युमेंट्री 'नयनतारा : बियॉन्ड द फेअरी टेल' यामध्ये 10 मिनिटांची एक क्लिप वापरण्यात आली. यावरुन वाद कोर्टात सुरु आहे. 

Read More