Marathi News> मनोरंजन
Advertisement

लाखो फॉलोअर्स असलेली ऐश्वर्या बच्चन फक्त या एकाच व्यक्तीला करते फॉलो

ऐश्वर्या फक्त या एकाच व्यक्तीला करते इन्स्टावर फॉलो

लाखो फॉलोअर्स असलेली ऐश्वर्या बच्चन फक्त या एकाच व्यक्तीला करते फॉलो

मुंबई : ऐश्वर्या राय बच्चन ही बी-टाऊनमधील सर्वाधिक पसंत केली जाणारी अभिनेत्री आहे. मिस वर्ल्ड राहिलेली ऐश्वर्याने अनेक चित्रपट केले. तिचा शेवटचा चित्रपट 2018 मध्ये आला होता. सोशल मीडियावर आज ऐश्वर्याचे अनेक फॉलोअर्स आहेत. ते दररोज वाढत आहेत. लाखो फॉलोअर्स असूनही ती फक्त एकाच व्यक्तीला इन्स्टाग्रामवर फॉलो करते.

इन्स्टाग्रामवर बच्चन कुटुंबीयाची सून असेल्या ऐश्वर्याला तुम्हीही फॉलो करत असाल, पण ऐश्वर्या कोणाला फॉलो करते. हे तुम्हाला ही माहित नसेल. पती अभिषेक बच्चन सोबत विवाह केल्यानंतर तिने बॉलिवूडपासून अंतर ठेवलं आहे. सध्या ती खूपच कमी चित्रपटांमध्ये दिसेत. ती कुटुंबासोबत बराच वेळ घालवते. मुलगी आराध्या बच्चन, सासरे अमिताभ बच्चन, सासू जया बच्चन आणि इतर कुटुंबियातील व्यक्तीसोबत ती नेहमी वेळ घालवते आणि फोटो देखील शेअर करते.

fallbacks

ऐश्वर्या राय बच्चनच्या सोशल मीडिया अकाउंटवर इतर कोणत्याही जाहिराती दिसत नाहीत. 

आश्चर्याची गोष्ट म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन फक्त एकाच इन्स्टाग्राम अकाउंटला फॉलो करते. परंतु कोण? ते अमिताभ बच्चन नाहीत, ऐश्वर्या फक्त नवरा अभिषेक बच्चनला फोलो करते. तिचा नवरा अभिनेता अभिषेक बच्चन ही एकमेव अशी व्यक्ती आहे जिचा इन्स्टाग्रामवर ऐश्वर्या फॉलो करते. अभिषेक आणि ऐश्वर्याने 2007 मध्ये लग्न केले होतो आणि 2011 मध्ये त्यांनी मुलगी आराध्या झाली होती.

Read More