Marathi News> मनोरंजन
Advertisement

ऐश्वर्याने बेबी बम्प लपवण्यासाठी लढवली कमालीची शक्कल...

ऐश्वर्याच्या प्रेग्नेसी लूकची सर्वत्र चर्चा; एकदा तर नेसली सासूची साडी

ऐश्वर्याने बेबी बम्प लपवण्यासाठी लढवली कमालीची शक्कल...

मुंबई : सेलिब्रिटींच्या खासगी आणि प्रोफेशल आयुष्यात नेमकं काय घडत आहे, हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते कायम उत्सुक असतात. अशा प्रसिद्ध सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन. ऐश्वर्या आता बॉलिवूड आणि सोशल मीडियापासून दूर आहे. कधीतरी ऐश्वर्या सोशल मीडियावर मुलगी अराध्या बच्चनसोबत फोटो  शेअर करत असते. सोशल मीडियावर कमी ऍक्टिव्ह असणाऱ्या बच्चन कुटुंबावर कॅमेऱ्याची नजर कायम असते. त्यामुळे या माय-लेकीला अनेक ठिकाणी स्पॉट केलं जात. जेव्हा ऐश्वर्या आई होणार ही बातमी समोर येताचं तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला. 

fallbacks

दरम्यान, ऐश्वर्या कायम कॅमेऱ्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असते. पण पब्लिक फिगर असल्यामुळे ऐश्वर्या अनेकदा कॅमेऱ्यात कैद झाली. गरोदर असताना अनेकदा ती बेबी बम्प लपवताना देखील दिसली. बेबी शॉवरच्या मैक्यावर देखील तिचा सुंदर लूक समोर आला.  यावेळी ऐश्वर्याने कांजीवरम साडी नेसली होती. 

fallbacks

ऐश्वर्याने लग्नात देखील कांजीवरम साडी नेसली होती. यावरून तिचं कांजीवरम साडीवर असलेलं प्रेम दिसून आलं. ऐरवी ऐश्वर्या कायम चर्चेत असते पण प्रेग्नेंसीमध्ये देखील चर्चांना उधाण आलं. एकदा तर ती सासू जया बच्चन यांच्या साडील बेबी बम्प लपवताना दिसली. तेव्हा देखील तिचा लूक अनेकांना आवडला. 

fallbacks

ऐश्वर्या राय तिच्या प्रेग्नेसीदरम्यान क्वचितच सार्वजनिक कार्यक्रमांना जात असे. अभिनेत्री तिच्या पतीसोबत एका कार्यक्रमात आली होती आणि यासाठी तिने तिच्या आवडत्या फॅशन डिझायनर जोडी अबू जानी-संदीप खोसला यांनी डिझाईन केलेला ब्लॅक एम्ब्रोयडरी कुर्ता सेट निवडला. यामध्ये ऐश्वर्या खूप सुंदर दिसत होती.

Read More