Ashwarya Rai- Abhishek Bachchan : बॉलिवूड ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत. दोघं पुण्यात एका कार्यक्रमात पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची लेक आराध्या बच्चन देखील या कार्यक्रमात दिसली होती. या लग्नाच्या कार्यक्रमात त्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सगळ्यात आधी जे फोटो समोर आले त्यात ऐश्वर्या अभिषेक हे एकमेकांजवळ उभे होते. त्यांनी कॅमेरा पाहाताच एकत्र पोज देखील दिल्या. पण त्या सगळ्यांत त्यांचा आता जो व्हिडीओ समोर आला आहे त्यानं सगळ्यांना आश्चर्य होत आहे.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन कुटुंबासोबत पोज देताना दिसत आहे. एका व्हायरल होणाऱ्या फोटोत अभिषेकनं गुलाबी रंगाचं हूडी परिधान केलं आहे. तर ऐश्वर्या आणि आराध्या एकत्र दिसत आहेत. तर दुसऱ्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत ते एकत्र दिसत आहेत. आराध्या आणि ऐश्वर्या हे पुढे आहेत तर त्यांच्या मागे अभिषेक उभा आहे. हा व्हिडीओ शेअर करत एका नेटकऱ्यानं कमेंट केली की 'ते एकत्र असे उभे आहेत. जणू काही त्यांना एकत्र असं कॅमेऱ्यासमोर उभं रहायचं नव्हतं.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'मला वाटतं की नवरा आणि बायकोचं एकमेकांशी जमत नाही.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'एकमेकांकडे पाहिलं देखील नाही.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'नो केमिस्ट्री फेक स्माइल.'
एका नेटकऱ्यांनं रेडिटवर फोटो पोस्ट करत लिहिलं की 'मी श्लोका शेट्टीला फॉलो करतो, जी ऐश्वर्याच्या मामाची मुलगी आहे. श्लोकाच्या भावाचं नुकतंच लग्न झालं आणि अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या अनेक फोटोंमध्ये एका सर्वसामान्य कुटुंब कसं राहतं तसे राहत असल्याचं दिसलं.' लग्नाचा आणखी एक फोटो व्हायरल होतोय. त्यात लग्नात आलेल्या एका पाहुण्यासोबत फोटोसाठी ऐश्वर्या पोज देताना दिसली. त्या फोटोत तिनं मांग टीका लावला होता आणि केस मोकळे ठेवले होते.
हेही वाचा : 4 दिवसात 100 कोटींची कमाई करूनही नव्यानं प्रदर्शित होणार मोहनलाल 'L2: एम्पुरान', 'तो' एक सीन भोवला
ऐश्वर्या आणि अभिषेकच्या कामाविषयी बोलायचं झालं तर रेमो डिसूझाच्या 'बी हॅप्पी' मध्ये अभिषेक बच्चन दिसला. तर ऐश्वर्या ही 2023 मध्ये 'पोन्नियिन सेलवन: II' मध्ये दिसली होती.