Aishwarya Rai Bachchan Car Accident: बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या कारचा अपघात झाला आहे. मुंबईत हा अपघात झाला आहे. बेस्ट बसने ऐश्वर्याच्या कारला धडक दिल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या अपघातात कोणतीही दुखापत किंवा मोठे नुकसान झाले नाही.
ऐश्वर्या रायच्या सिल्वर वेलफायर ही कार दुर्घटनाग्रस्त झाली आहे. हा अपघात मुंबईच्या सांताक्रुझ परिसरात झाला आहे. 231 नंबरच्या बसने ऐश्वर्या रायच्या सिल्वर वेलफायरला धडक दिल्याचे दिसत आहे. बससमोर ऐश्वर्याची कार दिसत आहे. ज्या वेळी ही घटना घडली तेव्हा कार मध्ये नेमकं कोण होते हे समजू शकलेले नाही.
या घटनेनंतर लोकांची गर्दी झाल्याचे दिसत आहे. हा फार मोठा अपघात नसून अत्यंत किरकोळ अपघात असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बेस्ट बसचा ऐश्वर्याच्या कारला हलका धक्का लागल्याचे सांगितले जात आहे. ऐश्वर्याच्या कारला साधा डेंट देखील आलेला नाही.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अभिनेता सोनू सूदच्या पत्नीचा अपघात झाल्ची घटना 25 मार्च रोजी घडली होती. अपघातात सोनाली सूद आणि मेहुणी सुनीता जखमी झाल्या आहेत. दोघींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सांगलीच्या आष्टा येथे दुचाकी आणि डंपरचा भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये 2 मुलांसह वडिलांचा जागीच मृत्यू झालाय. तर आई गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पती-पत्नी आणि दोन मुलं असं हे कुटुंब दुचाकीवरून इस्लामपूरच्या दिशेनं जात होतं. त्यावेळी समोरून आलेल्या भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.