सोशल मीडियावर अनेक कलाकारांचे डुप्लीकेट पाहायला मिळत आहेत. यामध्ये ऐश्वर्याची हुबेहुब दिसणारी व्यक्ती देखील चर्चेत असते. ऐश्वर्यासारखेच निळे डोळे, तेच सौंदर्य असलेली पाकिस्तानी डुप्लीकेट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ऐश्वर्या आणि तिच्या डुप्लीकेटला पाहिलं तर या दोघींना ओळखण कठीण झालं आहे. हिचं नाव आहे कंवल चीमाय
सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या रायसारखी दिसणारी कंवल चीमा दिसत आहे. कंवल चीमाने पिवळा ड्रेस घातला आहे आणि ती अगदी ऐश्वर्या रायसारखी दिसत आहे. कंवल चीमाचा चेहरा, डोळे आणि ती ज्या पद्धतीने चालते ते अगदी ऐश्वर्यासारखीच दिसते. विशेष म्हणजे ऐश्वर्या राय प्रमाणेच कंवलचेही डोळे निळे आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या राय पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हायरल व्हिडिओवर एका युजरने लिहिले आहे की, 'अजय देवगणनंतर आता ऐश्वर्या रायची हँडसम व्हायरल होत आहे'. दुसऱ्या एका युझरने लिहिले आहे की, 'ऐश्वर्या रायसारखी दिसणारी मुलगी पाहून हे सिद्ध होते की, जगात प्रत्येकाचे सात डुप्लिकेट आहेत.' तिसरा युझर लिहितो, 'ती ऐश्वर्या राय बच्चनपेक्षाही सुंदर आहे'.
कंवल चीमा ही पाकिस्तानी वंशाची ऑस्ट्रेलियन व्यावसायिक महिला आहे, जी 'माय इम्पॅक्ट मीटर'ची संस्थापक आहे. 'माय इम्पॅक्ट मीटर' हे एक टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म आहे. हे व्यासपीठ जगभरातील गरजूंना मदत करणाऱ्या लोकांना जोडण्याचे काम करते. या प्लॅटफॉर्मद्वारे, असहाय्य लोकांपर्यंत आवश्यक वस्तू पोहोचवल्या जातात. कंवल चीमा पूर्वी 200 अब्ज डॉलर्सच्या कंपनीत मोठ्या पगारावर काम करत होती, परंतु तिने नोकरी सोडून हे स्टार्टअप सुरू केले आणि या मोहिमेमुळे ती अनेक देशांमध्ये लोकप्रिय आहे.