Marathi News> मनोरंजन
Advertisement

ऐश्वर्याकडून पुन्हा देशाचं नाव रोशन

आपल्या सौंदर्याने सर्वांना घायाळ करणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन

ऐश्वर्याकडून पुन्हा देशाचं नाव रोशन

मुंबई : आपल्या सौंदर्याने सर्वांना घायाळ करणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने पुन्हा अपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. फ्रेंच वर्कबुकच्या कव्हर पेजवर तिचा चेहरा झळकला आहे.  इंग्रजी माध्यमातील विद्यार्थांना इतिहास आणि संस्कृतीबद्दल अधिक माहिती मिळावी यासाठी फ्रेंच बुकचा वापर केला जातो. सौंदर्याची खाण असलेल्या ऐश्वर्याने १९९४ साली ‘मिस वर्ल्ड’चा किताब पटकावला होता. ‘मिस वर्ल्ड’ होण्यासाठी केवळ सुंदरताच नाही तर कुशाग्र बुद्धिमत्ता व हजरजबाबीपणाही महत्त्वाचा असतो, हे ऐश्वर्याने सिद्ध केलं होतं.

त्यानंतर आता तिचे धडे चक्क विद्यार्थांच्या अभ्याक्रमामध्ये आले आहेत. त्यामुळे तिने पुन्हा देशाचं नाव रोशन केलं असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 'फायरवर्क्स वर्कबुक'च्या २०१९ च्या आवृत्तीत जगातल्या प्रसिद्ध जागेतील आणि दिग्गज व्यक्तींचे फोटो आहेत. 

ऐश्वर्या शिवाय या पुस्तकात 'ताजमहल'चे देखील फोटो आहेत. या पुस्तकात फक्त ऐश्वर्याचे फोटो नाहीत, तर 'नॉलीवूड आणि बॉलिवूड' नावाच्या धड्यामध्ये तिच्या विषयी अनेक प्रश्न देखील विचारण्यात आले आहेत. त्याचप्रमाणात अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनस संबंधतीत देखील प्रश्न विचारण्यात आले आहेत. 

ऐश्वर्याने नुकताच 'मलेफिसेंट: ऑफ ईव्हील' चित्रपटातील एन्जलिना या भूमिकेला आपला आवाज दिला. हा चित्रपट गेल्या महिन्यात भारतात प्रदर्शित झाला होता. त्याचप्रमाणे बॉलिवूडचे अनेक हिट चित्रपटं देखील ऐश्वर्याच्या नावावर आहेत. 

Read More