Marathi News> मनोरंजन
Advertisement

ऐश्वर्यानं नकार दिलेल्या आमिरच्या 'या' चित्रपटानं पटकावले होते 12 पुरस्कार, बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई

Aishwarya Rai-Aamir Khan : ऐश्वर्या रायनं आमिर खानच्या या गाजलेल्या चित्रपटाला दिला होता नकार

ऐश्वर्यानं नकार दिलेल्या आमिरच्या 'या' चित्रपटानं पटकावले होते 12 पुरस्कार, बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई

Aishwarya Rai-Aamir Khan : बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. आमिर खाननं आजवर अनेक ब्लॉबस्टर चित्रपट दिले. त्याच्या अनेक चित्रपटांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. पण त्याचा 1996 मध्ये प्रदर्शित झालेला तो चित्रपट तुम्हाला आठवतोय का? जो चित्रपट फक्त बॉक्स ऑफिसवर हिट ठरला नव्हता तर त्यासोबत त्याला तब्बल 12 पुरस्कार मिळाले होते. या चित्रपटात आमिर खानसोबत अभिनेत्री करिश्मा कपूर दिसली होती. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट हा फिल्मफेयर पुरस्कार देखील मिळाला होता. चला तर जाणून घेऊया कोणता आहे हा चित्रपट?

आमिरनं दिला होता नकार...

जर तुम्ही ओळखलं नसेल तर हा चित्रपट म्हणजे 'राजा हिंदुस्तानी'. 'राजा हिंदुस्तानी' हा चित्रपट 1996 मध्ये प्रदर्शित झाला. आयएमडीबीनुसार, आमिर खाननं हा चित्रपट करण्यासाठी सगळ्यात आधी नकार दिला होता. त्यानंतर दिग्दर्शकानं आमिर खानला समजावल त्याची समजूत काढली की हा चित्रपट हिट होऊ शकतो. त्यानंतर आमिरनं चित्रपट करण्यास होकार दिला. या चित्रपटात आमिरसोबत करिश्मा कपूर महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. पण तुम्हाला माहितीये का सगळ्यात आधी अर्थात करिश्माच्या आधी या चित्रपटाची ऑफर ही ऐश्वर्या रायला मिळाली होती.

...तर करिश्माच्या जागी दिसली असती ऐश्वर्या राय

वोगला दिलेल्या एका मुलाखतीत ऐश्वर्यानं सांगितलं होतं की "जर मी मिस इंडिया या स्पर्धेत सहभागी झाले नसते तर माझा पहिला चित्रपट हा 'राजा हिंदुस्तानी' असता."

हेही वाचा : आमिर पुन्हा पुन्हा का करतोय लग्न? सलमान खुलासा करत म्हणाला, 'तोपर्यंत करेल जोपर्यंत...'

राजा हिंदुस्तानी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फिल्मफेयर अवॉर्ड मिळाला होता. त्याशिवाय त्याला 12 अवॉर्ड्स देखील मिळाले होते. आमिर खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देखील मिळाला होता. फक्त आमिरच नाही तर करिश्मा कपूरला देखील या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. तर त्यावर्षीचा बेस्ट म्यूजिक दिग्दर्शकाचा पुरस्कार देखील याच चित्रपटाला मिळाला होता.या चित्रपटाचं बजेट हे 5.75 कोटी होतं आणि या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर वर्ल्डवाईड 76.34 कोटींची कमाई केली होती. याशिवाय करिश्माचा हा तिच्या करिअरमधील हा सगळ्यात जास्त यशस्वी ठरलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटातील आमिर आणि करिश्माच्या केमिस्ट्रीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. त्या दोघांमधील किसींग सीनची आजही अनेकदा चर्चा होत असल्याचे आपण पाहतो. या चित्रपटाचा कन्नड भाषेत रिमेकही बनवण्यात आला होता. 

Read More