Marathi News> मनोरंजन
Advertisement

ऐश्वर्यापेक्षा कमी नाही तिची वहिनी, कधी होती Mrs India Globe; कोण आहे ही सौंदर्यवती?

Aishwarya Rai's Sister In Law : ऐश्वर्या रायची वहिनी काय करते माहितीये? सुंदरतेमध्ये नाही तिच्यापेक्षा कमी...

ऐश्वर्यापेक्षा कमी नाही तिची वहिनी, कधी होती Mrs India Globe; कोण आहे ही सौंदर्यवती?

Aishwarya Rai's Sister In Law : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण तिच्या कुटुंबाविषयी खूप कमी गोष्टी आहेत ज्या कोणाला माहित आहेत. अभिषेकसोबत लग्न करण्या आधी तिच्या कुटुंबात कोण कोण होतं, या सगळ्यांविषयी कोणाला काही माहित नाही. तिच्याविषयी जी काही माहिती आहे ती लग्नानंतरची अर्थात बच्चन कुटुंबाची आहे. ऐश्वर्याचा भाऊ आदित्य रायला लाईमलाईटपासून लांब राहायला आवडतं. पण ऐश्वर्याची वहिनीची देखील एक वेगळीच लोकप्रियता आहे.

श्रीमा राय असं ऐश्वर्याच्या वहिनीचं नाव आहे. श्रीमा ही एक कॉन्टेन्ट क्रिएटर आणि ब्युटी व्लॉगर आहे. तिचं स्वत: इन्स्टाग्राम पेज असून त्यावर 1.2 लाख फॉलोवर्स आहेत याशिवाय तिचं युट्यूब चॅनल आहे. ती तिच्या सोशल मीडियावर आणि युट्यूबवर तिच्या हेअर केअर, स्टायलिंग आऊटफिट, पोस्ट अपडेट देत राहते. याशिवाय तिच्या कुटुंबातील काही खास क्षण देखील ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. 

श्रीयाचं पेज पाहिल्यानंतर तिला फॅशन आणि कॉन्टेन्ट क्रिएटर करायला आवडतं हे दिसून येतं. श्रीमा विषयी बोलायचं झालं तर तिनं 2009 मध्ये Mrs India Globe हा खिताब जिंकला होता. त्यावर्षी मिसेस इंडिया या ब्युटी पेजंटमध्ये ती दुसऱ्या क्रमांकावर आली होती. श्रीमा आणि आदित्य यांना दोन मुलं आहेत. एकाच नाव शिवांश आणि दुसऱ्याचं विहान आहे. ते सगळे व्रिणा राय यांच्यासोबतच राहतात. 

हेही वाचा : प्रियांका चोप्राच्या वहिनीला हळदीमुळे झाली रिअ‍ॅक्शन; जाणून घ्या हळदीचा वापर योग्यरित्या कसा करावा?

श्रीमा कधीतरीच नणंद ऐश्वर्या रायसोबत फोटो शेअर करते. श्रीमानं सगळ्यात शेवटी ऐश्वर्यासोबतचा फोटो तेव्हा शेअर केला होता जेव्हा तिनं तिच्यासोबत लग्नाचा एक थ्रो बॅक फोटो शेअर केला होता. हा फोटो श्रीमानं गेल्या वर्षी मे महिन्यात शेअर केला होता. इतकंच नाही तर त्या दोघी एकमेकांना सोशल मीडियावर फॉलो देखील करत नाहीत. दरम्यान, जर कोणी तिच्या पोस्टवर ऐश्वर्या राय संबंधीत कमेंट केली तरी श्रीमा त्याला लाइक करताना दिसते. त्याकडे ती कधी दुर्लक्ष करताना दिसत नाही. 

Read More