Marathi News> मनोरंजन
Advertisement

ऐश्वर्या रायने रचला कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये नवा विक्रम

सलग 17 वर्ष भारताचं कान्स फेस्टिव्हलमध्ये प्रतिनिधित्व करणारी अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन. ऐश्वर्या ही भारताचं फ्रान्समध्ये प्रतिनिधित्व करणारी पहिली बॉलिवूड अभिनेत्री आहे. 

ऐश्वर्या रायने रचला कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये नवा विक्रम

 मुंबई : सलग 17 वर्ष भारताचं कान्स फेस्टिव्हलमध्ये प्रतिनिधित्व करणारी अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन. ऐश्वर्या ही भारताचं फ्रान्समध्ये प्रतिनिधित्व करणारी पहिली बॉलिवूड अभिनेत्री आहे. 

 कान्स फेस्टिवलमध्ये ऐश्वर्या -  

 ऐश्वर्या राय बच्चनने पहिल्यांदा कान्स फेस्टिवलमध्ये सहभाग घेतल्यानंतर नीता लुल्लाने डिझाईन केलेली साडी परिधान केली होती. त्यावेळेस शाहरूख खान आणि संजय लीला भंसाली यांच्यासोबत 2002 साली कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सहभाग घेतला होता. ऐश्वर्याच्या सौंदर्याचं, तिने परिधान केलेल्या कपड्यांकडे नेहमीच सार्‍यांचे लक्ष असते.  

 देवदासचं स्क्रिनिंग  

 2002 साली पहिल्यांदा ऐश्वर्या राय बच्चन देवदासच्या स्क्रिनिंगसाठी कान्समध्ये पोहचली होती. त्यावेळेस साडी परिधान करून आलेल्या ऐश्वर्यावर टीका करण्यात आली होती.  

 यंदाही ऐश्वर्या रेड कार्पेटवर  

 12,13 मे रोजी ऐश्वर्या रेड कार्पेटवर उतरणार आहे. 

Read More