Aishwarya Rai Video: गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री, बच्चन कुटुंबाची सून आणि मिस वर्ल्ड ऐश्वर्या रायचे सोशल मीडियावर मोठ्या चाहत्या वर्ग आहे. नेटकरी सोशल मीडियावर ऐश्वर्या राय बच्चनाला फॉलो करतात. तिच्या आयुष्यातील घडामोडी जाणून घेण्यात नेटकऱ्यांना खूप उत्सुकता असते. ऐश्वर्या हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे.
खरं तर, ऐश्वर्या (Aishwarya) आपल्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी रजनीकांत (Rajinikanth) आणि मणिरत्नम (Mani Ratnam) यांच्यासोबत जे काही केलं त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) तुफान बघितला जातो आहे. मणिरत्नम यांच्या 'पोनिया सेलवन पार्ट 1' (Ponniyan Selvan Part 1) या चित्रपटाचा ट्रेलर लाँच (Trailer Launch) झाला आहे. चेन्नईत (Chennai) मंगळवारी उत्सवाचं वातावरण होतं. ट्रेलर लाँच कार्यक्रमाला चित्रपटाची संपूर्ण कास्ट पोहोचली होती. या कार्यक्रमात कमल हसन देखील प्रमुख पाहुणे म्हणून पोहोचले होते, पण या कार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे सुपरस्टार रजनीकांत.
या कार्यक्रमादरम्यान ऐश्वर्या रजनीकांतला बघताच त्यांच्याकडे गेली. ऐश्वर्या जशी वाकून नमस्कार करायला जाते थलैवाने तिला नतमस्तक होण्यापासून थांबवलं आणि मिठी मारून आशीर्वाद दिला. यानंतर दोघांनी एकमेकांना हात जोडून अभिवादन केलं. ऐश्वर्याने रजनीकांत यांना दिलेला मान पाहून उपस्थितांनी एकच टाळ्यांचा कडकडाट केला. रजनीकांत आणि ऐश्वर्याने 'रोबोट' चित्रपटात एकत्र काम केले आहे.
It happened guys. Aishwarya Rai touched Rajinikanth's feet #AishwaryaRaiBachchan #Rajinikanth#PonniyinSelvanpic.twitter.com/FMjj9SIYFJ https://t.co/220rrV1wMj
— Aishwarya as Nandini(PonniyinSelvan)'ll b Historic (@badass_aishfan) September 6, 2022
या कार्यक्रमात पोहोतल्यानंतर सर्व प्रथम ऐश्वर्याने 'पोनियान सेल्वन पार्ट 1' चे दिग्दर्शक मणिरत्नम यांना बघताचा क्षणी त्यांच्याकडे धावत गेली आणि मिठी मारून त्यांचं स्वागत केलं.हे दोन्ही घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
The way she ran to her Mentor and that wholesome hug to her Guru. Respect
— أسري (@nameis_asri) September 6, 2022
AISH u stole my #PonniyinSelvan #PS1Trailer pic.twitter.com/xsi5gy9D5G
या सोहळ्यासाठी ऐश्वर्या राय काळ्या रंगाची सलवार-कुर्ती आणि दुपट्ट्यात घालून आली होती. मणिरत्नम यांनी 1997 मध्ये 'इरुवर' या सिनेमातून ऐश्वर्या रायला लॉन्च केलं होतं. यानंतर या जोडीने 'रावण' आणि 'गुरू' या चित्रपटातही एकत्र काम केलं आहे.