Marathi News> मनोरंजन
Advertisement

Rajinikanth यांच्या मुलीच्या घरी 100 तोळं सोनं चोरी करणारे सापडले! घरातल्याच...

Rajinikanth यांची लेक आणि अभिनेता धनुषची पत्नी ऐश्वर्याच्या ज्या घरात चोरी झाली त्या घरात ती तिच्या दोन्ही मुलांसोबत राहते. दरम्यान, ऐश्वर्याच्या घरात गेल्या महिन्यात चोरी झाली होती. चोरी झाल्यानंतर ऐश्वर्यानं पोलिस ठाण्यात जाऊन याविषयी तक्रार दाखल केली होती. जवळपास एक महिन्यानंतर आता पोलिसांनी चोराला अटक केले आहे. 

Rajinikanth यांच्या मुलीच्या घरी 100 तोळं सोनं चोरी करणारे सापडले! घरातल्याच...

Jewellery Stolen  From Aishwarya's House : दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटांमधून सगळ्यांना त्यांच्या अभिनयानं भूरळ पाडणारे अभिनेता रजनीकांत (Rajinikanth) हे सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांचे चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्यांची लेक ऐश्वर्या (Rajinikanth Daughter Aishwarya). ऐश्वर्या ही रजनीकांत यांची मोठी मुलगी आणि अभिनेता धनुषची (Dhanush's Ex-Wife) पत्नी आहे. गेल्या महिन्यात ऐश्वर्यांच्या चैन्नईच्या घरातून तिच्या लग्नाचे दागिने चोरीला गेले होते. दागिने चोरी झाल्याचे कळताच पोलिसांनी ही तक्रार देखील दाखल केली होती. काल 21 मार्च रोजी पोलिसांनी ऐश्वर्याची मोलकरीण आणि तिच्या ड्रायव्हरला अटक केली. त्या दोघांवर दागिने चोरल्याचा आरोप आहे. 

रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्याच्या ड्रायव्हरचं नाव वेंकशेटन आहे. त्याच्या सांगण्यानं तिची मोलकरीन ईश्वरीनं 100 तोळ्याच्या जवळपास सोन्याचे दागिने आणि 30 ग्रॅमची डायमंड जुलरी आणि 4 किलोच्या आसपास चांदीचे दागिने चोरले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या महिलेनं सगळे दागिने विकले. दागिने विकल्यानंतर त्यातून मिळालेल्या पैशातून त्या महिलेनं घर खदेरी केलं आहे. ज्या घरातून चोरी झाली त्या घरात ऐश्वर्या तिच्या दोन्ही मुलांसोबत राहते. तर ऐश्वर्यानं केलेल्या आरोपात तिनं म्हटलं आहे की तिनं लॉकरमध्ये दागिने ठेवले होते. तिथून सगळे दागिने चोरीला गेले आहेत. (jewellery stolen Form Aishwarya's House) 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : 'कालचा दिवस कठीण होता, पण आज...', Mrunal Thakur नं रडत फोटो केला शेअर

ऐश्वर्याकडे ईश्वरी ही गेल्या 18 वर्षांपासून कामाला आहे. त्यामुळे तिला घरातील सगळे कोपरे माहित आहेत. याशिवाय ईश्वरीला लॉकरची चावी कुठे असते हे देखील माहित होते. तिनं बऱ्याचवेळा लॉकर उघडण्यासाठी त्या चावीचा वापर करायची. पोलिसांनी ईश्वरीला अटक केल्यानंतर तिच्याकडून नवीन घर खरेदी केल्याचे कागदपत्र देखील सापडले आहेत. ऐश्वर्यानं गेल्या महिन्यात पोलिसात चोरीचा आरोप केला होता. तिनं केलेल्या तक्रारीत ऐश्वर्यानं सांगितलं की सगळ्यात शेवटी हे दागिने 2019 तिनं बहिण सौंदर्याच्या लग्नात घातले होते. चोरी करण्यात आलेल्या दागिन्यांमध्ये जुने सोन्याचे दागिने, नवरत्नाचा सेट, हार आणि बांगड्यांचा समावेष आहे. सौंदर्याच्या लग्नात हे दागिने परिधान केल्यानंतर तिनं हे दागिने लॉकरमध्ये ठेवले होते. पण 10 फेब्रुवारी रोजी तिनं पाहिलं की लॉकरमध्ये दागिने नाहीत.  तेनामपेट पोलिसांनी भादंवि कलम ३८१ अन्वये गुन्हा दाखल करत तपासनी सुरु केली आहे.

Read More