Marathi News> मनोरंजन
Advertisement

ऐश्वर्या 44 व्या वर्षातही दिसतेय दिलखेच अंदाजात

 ऐश्वर्या राय बच्चन केवळ सुंदरच नाही तर तिचा फॅशन सेन्सही कमालीचा आहे. 

ऐश्वर्या 44 व्या वर्षातही दिसतेय दिलखेच अंदाजात

मुंबई : बॉलीवुड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन केवळ सुंदरच नाही तर तिचा फॅशन सेन्सही कमालीचा आहे. मागच्या काळात अनेक सुंदरी बॉलीवुडमध्ये आल्या पण ऐश्वर्याने आपलं वेगळेपण आजही जपलंय. साडीत असो वा वेस्टर्न ड्रेसमध्ये तिचा अंदाज नेहमीच दिलखेच असतो. 44 वर्षांची ऐश्वर्या आपल्या वयापेक्षा खूपच लहान दिसते. नुकतीच ती टेनिस प्रिमियर लीगच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये पोहोचली होती. इथे ती नेहमीप्रमाणेच लक्षवेधक ठरली.

3 लाखाहून अधिक लाईक्स

यावेळी ती लॉंग स्लीव्स पैंस सूट वर दिसली. आपला लूक पूर्ण करण्यासाठी तिने लिपस्टिक, सॉफ्ट कर्ल्स आणि डुई मेकअप केला होता.

या क्लासी लुकसोबत ऐश्वर्याचे सोडलेले केस तिच्या सौंदर्यात आणखी भर टाकत होते.

ऐश्वर्याने आपला हा फोटो सोशल मीडिया अकाऊंट वर शेअर करताच बघता बघता त्याला 3 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

तिच्या फॅन्सनी फोटो खाली कमेंट्सचा पाऊसच पाडलायं. 

अनुराग कश्यपच्या आगामी 'गुलाब जामुन' सिनेमात ती पती अभिषेक आणि सासरे अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहे. 

Read More