Marathi News> मनोरंजन
Advertisement

ऐश्वर्याची 'ती' मुलाखत : संशय घेऊन सलमान करायचा टॉर्चर

१९९७ मध्ये या दोघांच प्रेमप्रकरण सुरू झाल. पण हम तुम्हारे है सनम (२००२) च्या रिलीज नंतर त्यांच ब्रेकअप झाल होतं. 

ऐश्वर्याची 'ती' मुलाखत : संशय घेऊन सलमान करायचा टॉर्चर

मुंबई : बॉलीवूडमधील सलमान खान आणि ऐश्वर्या यांच ब्रेकअप सर्वात वाईट मानल जात. ब्रेकअपनंतर ऐशने सलमानवर मारहाणीपासून संशय घेण्यापर्यंतचे आरोप लावले. ऐश्वर्याची एक जुनी मुलाखत समोर आली आहे. ज्यामध्ये ब्रेकअपनंतर ऐशने सलमानवर खूप आरोप लावले आहेत. १९९७ मध्ये या दोघांच प्रेमप्रकरण सुरू झाल. पण हम तुम्हारे है सनम (२००२) च्या रिलीज नंतर त्यांच ब्रेकअप झाल होतं. 

२००२ मध्ये ब्रेकअप झाल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत ती बोलत होती. मी आणि सलमानने गेल्या मार्चमध्ये ब्रेकअप केलयं.  पण तो अजून या धक्क्यातून बाहेर आला नाही. ब्रेकअपनंतर त्याने मला कॉल केला आणि नको नको ते बोलू लागला. माझे इतर अभिनेत्यांशी संबंध असल्याचा संशय तो घेत राहायचा.  अभिषेक बच्चनपासून ते शाहरूख खानपर्यंत सर्वांशी माझ नाव त्याने जोडल. अनेकदा तो मला मारहाणही करायचा. पण काही झालच नाही अस समजून कामाला परतायची.

सलमानने दिला धोका 

सलमानच्या वाईट काळात मी त्याच्यासोबत राहिली तरीही तो माझ्याशी हिंसक वागायचा. दारूच्या नशेत अभद्र व्यवहारही करायचा. शारिरीक, तोंडी, भावनिक इजा पोहोचवायचा.

आम्ही एकत्र असताना त्याने मला धोका दिला. त्याने स्वत: ही अनेकदा याची कबुली दिली.  मग मी तेच केल जे आत्मसन्मानासाठी एखादी मुलगी करते. मी सलमानशी संबंध तोडले.

सलमानने दिल होत उत्तर 

ऐश्वर्याला मी कधीच मारहाण केली नसल्याचे सलमानने मुलाखतीत सांगितले होते. मला कोणीही मारू शकत.

सेटवर असलेल्यांपैकी कोणीही फाइटमध्ये मला मारू शकत. त्यामुळेच मला कोणी घाबरत नाही. मी भावनिक होतो. भिंतीवर डोक आपटचो. मी कोणाला त्रास नाही देऊ शकत.

मी फक्त सुभाष घईला मारल होत, पण दुसऱ्या दिवशी माफीही मागितली होती. 

Read More