Marathi News> मनोरंजन
Advertisement

ऐश्वर्याची पहिली 'इंस्टा' पोस्ट, कमी फॉलोअर्समुळे नाराज

कमी फॉलोअर्स आणि ब्लू टीक आली नसल्याने ऐश्वर्या नाराज असल्याचेही बोलले जात आहे.

ऐश्वर्याची पहिली 'इंस्टा' पोस्ट, कमी फॉलोअर्समुळे नाराज

मुंबई : इंस्टाग्रामवर डेब्यू केल्यानंतर ११ तासांनी ऐश्वर्या रायने आपला पहिला फोटो शेयर केलाय. तिची पहिली पोस्ट मुलगी आराध्याच्या जन्मावेळची आहे. यामध्ये ती आराध्याला हातात घेऊन बसली आहे. 'माझा पुन्हा जन्म झाला' अशी कॅप्शन तिने या फोटोसोबत दिली आहे. सकाळी १०.४५ वाजता तिचे इंस्टाग्राम पेज लाइव्ह झाल होतं. त्यानंतर तिचे चाहते पोस्टची वाट पाहत होते. रात्री ऐश्वर्याचा आराध्यासोबतचा फोटो पाहायला मिळाला. अभिषेक बच्चन, सोनम कपूर आहूजा, दिया मिर्झा, अर्जुन कपूर, शेखर रविजानी, शिबानी दांडेकर हे ऐशला इंस्टावर फॉलो करत आहेत. ती आजपर्यंत इंस्टा, फेसबुक, ट्विटरवर नव्हती. ती इंस्टावर डेब्यु करणार असल्याचे गुरूवारी तिच्या पीआर टीमतर्फे सांगण्यात आले.

 

And I was born...again...

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

ऐश्वर्या नाराज  

कमी फॉलोअर्स आणि ब्लू टीक आली नसल्याने ऐश्वर्या नाराज असल्याचेही बोलले जात आहे. याबद्दल तिने आपल्या पीआर टीमला फटकारल्याचेही सांगण्यात येत आहे. सध्या तरी ऐश्वर्या आपली मुलगी आराध्यासोबत 'कान्स'ला गेली आहे. हा तिचा १७ वा कान्स अपीयरन्स आहे. गेल्यावर्षीही ऐश मुलीला घेऊन कान्सला गेली होती. 

Read More