Marathi News> मनोरंजन
Advertisement

'रेड 2' चित्रपट नाकारल्यामुळे इलियानाला पश्चाताप! अजय देवगणचा चित्रपट नाकारण्याचे सांगितले कारण

बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूजने 'रेड 2' चित्रपट नाकारण्याचे कारण सांगितले आहे. 

'रेड 2' चित्रपट नाकारल्यामुळे इलियानाला पश्चाताप! अजय देवगणचा चित्रपट नाकारण्याचे सांगितले कारण

Ileana D'cruz Raid 2: बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा 'रेड 2' हा चित्रपट एक महिन्यापूर्वी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. गेल्या एक महिन्यापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली पकड टिकवून आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात अजय देवगण सोबत इलियाना डिक्रूज देखील दिसली होती. यामध्ये तिने अभिनेत्याच्या पत्नीची भूमिका साकारली होती. मात्र, दुसऱ्या भागात इलियाना दिसली नाही. अशा परिस्थितीत आता अभिनेत्रीने खुलासा केला आहे की तिला 'रेड 2' मध्ये पुन्हा तीच भूमिका साकारण्याची ऑफर मिळाली होती. परंतु, अभिनेत्रीने ती ऑफर नाकारली. 

अशातच अभिनेत्री इलियाना डिक्रूजने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून तिने 'रेड 2' चित्रपटाची ऑफर का नाकारली यामागील कारण सांगितले आहे. रविवारी इलियाना डिक्रूजने तिच्या चाहत्यांसोबत प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये एका चाहत्याने त्याच्या पुनरागमनाबद्दल प्रश्न विचारला आणि म्हटले की तो 'रेड 2' आणि इतर चित्रपटांमध्ये तिची आठवण काढत आहे. यावर उत्तर देताना इलियाना डिक्रूज म्हणाली की, मला चित्रपटांमध्ये काम करण्याचीही आठवण येते आणि मला 'रेड 2' चा भाग व्हायचे होते. 'रेड' हा माझ्यासाठी एक खास चित्रपट होता आणि त्यात मालिनीची भूमिका साकारणे आणि दिग्दर्शक राजकुमार गुप्ता आणि अभिनेता अजय देवगण यांच्यासोबत काम करणे हा एक खूप खास अनुभव होता.

'रेड 2' चित्रपट नाकारण्याचे कारण

अभिनेत्री पुढे म्हणाली की, 'रेड 2' चित्रपटाच्या निर्मात्यांनी मला चित्रपटाची ऑफर दिली होती. पण दुर्दैवाने आम्ही शूटिंगची वेळ निश्चित करू शकलो नाही. कारण त्यावेळी मी माझ्या मुलाला जन्म दिला होता आणि यावेळी माझ्या जबाबदाऱ्या पूर्णपणे वाढल्या होत्या. त्यामुळे ती तिच्या कुटुंबाकडे आणि मुलाकडे पूर्ण लक्ष देत होती. त्यामुळे ती तिच्या करिअरकडे जास्त लक्ष देऊ शकत नाही.

वाणी कपूरने कोणतीही कसर सोडली नाही

'रेड 2' चित्रपटात इलियानाच्या जागी अभिनेत्री वाणी कपूरला कास्ट करण्यात आले आहे. तिने हे पात्र खूप सुंदरपणे साकारले आहे. इलियाना म्हणाली की, माझ्या मते मी पाहिलेल्या सर्व प्रोमोमध्ये वाणी खूपच सुंदर दिसत होती. मला खात्री आहे की तिने तिच्या व्यक्तिमत्त्वात तिची अनोखी आणि सुंदर छाप सोडली असेल. मला आशा आहे की आता कोणाच्याही मनात गैरसमज राहणार नाहीत.

Read More