Marathi News> मनोरंजन
Advertisement

अजय देवगनच्या नव्या सिनेमाची घोषणा...'ही' अभिनेत्री असणार मुख्य भूमिकेत

अजय देवगन आता पुन्हा एकदा पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. अजयने नुकतीच त्याच्या नव्या सिनेमाची घोषणा केली.

अजय देवगनच्या नव्या सिनेमाची घोषणा...'ही' अभिनेत्री असणार मुख्य भूमिकेत

मुंबईः बॉलिवूडचा 'सिंघम' अजय देवगन हा त्याच्या खास शैलीसाठी ओळखला जातो. सिंघम सिनेमातील पोलिसाच्या भूमिकेनंतर 'बॉलिवूडचा सिंघम' अशी अजयची ओळख बनली. चाहत्यांनाही अजयला पोलिसाच्या भूमिकेत पाहणं आवडतं. त्यामुळे अजय आता पुन्हा एकदा पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. अजयने नुकतीच त्याच्या 'भोला' या सिनेमाची घोषणा केली. नव्या सिनेमातही अजय पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 


एक्शन थ्रिलर साऊथ सिनेमा 'कॅथी' सिनेमाचा हा रिमेक असणार आहे. 'भोला' या सिनेमातही अजयची दबंग पोलीस अधिकाऱ्याची भूमिका पाहायला मिळेल. अभिनेत्री तब्बू पुन्हा एका अजयसोबत मुख्य भूमिकेत आहे.

fallbacks

अजय देवगन आणि तब्बू ही जोडी यापूर्वीही अनेक सिनेमात एकत्र आली होती. आता 'भोला'च्या निमित्तानं ते पुन्हा एकदा काम करणार आहेत. लवकरच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याचं समजत आहे. 'भोला' हा सिनेमा 30 मार्च 2023 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे अजयच्या चाहत्यांना तोपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 

Read More