Marathi News> मनोरंजन
Advertisement

Drishyam 2 Trailer: अजय देवगन फसणार? या नव्या अभिनेत्याच्या एन्ट्रीने वाढली उत्सूकता

Drishyam 2 trailer: अजर देवगन आता स्वत:ला कसं वाचवणार? सिनेमाची कथा वाढणार सस्पेंस.

Drishyam 2 Trailer: अजय देवगन फसणार? या नव्या अभिनेत्याच्या एन्ट्रीने वाढली उत्सूकता

मुंबई : 'दृश्यम' हा सिनेमा मल्याळम सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. ज्यामध्ये अजय देवगन (Ajay Devgan) मुख्य भूमिकेत आहे. 2015 मध्ये प्रेक्षकांनी ही थ्रिलर कथा अनुभवल्यानंतर आता पुन्हा एकदा त्याचा दुसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 7 वर्षानंतर या सिनेमाचा दुसरा भाग येत आहे. 'दृश्यम 2' बाबत प्रेक्षकांमध्ये उत्सूकता आहे. आज 'दृश्यम 2' (Drishyam 2) चाट्रेलर रिलीज झाला आहे. (New actor entry in drishyam 2)

ट्रेलरमध्ये पुन्हा एकदा त्या प्रकरणाची फाईल ओपन होते. '2 ऑक्टोबर' केस हे गेल्या काही वर्षात प्रसिद्ध झालं होतं. पण दृश्यम 2 मध्ये आणखी एका कलाकाराची एन्ट्री झाली आहे. तो म्हणजे अभिनेता अक्षय खन्ना.

'दृश्यम 2' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. पण त्यात काहीही उघड झालेलं नाही. त्याचा सस्पेंस कायम आहे. पण अक्षय खन्ना पोलिसाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. आयजी मीरा देशमुख (तब्बू) यांच्या बेपत्ता मुलाचा शोध घेण्याची ते शपथ घेतात. विजय साळगावकर (अजय देवगन) यांचं कुटुंब केस पुन्हा रिओपन झाल्याने टेन्शनमध्ये दिसत आहे.

अक्षय खन्नाची भूमिकेमुळे देखील सिनेमाची उत्सूकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. 'दृश्यम 2' मध्ये साळसकर कुटुंबाच्या चौकशीचे सीन देखील दाखवण्यात आला आहे. ट्रेलरच्या शेवटी विजय साळसकर एक कन्फेशन देताना देखील दिसतोय. हा सिनेमा 18 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे.

'दृश्यम' सिनेमाचे डायरेक्टर निशिकांत कामत आता आपल्यात नाहीत. पण 'दृश्यम 2' सिनेमाची कमान अभिषेक पाठक यांच्या हातात आहे. ट्रेलर पाहून असं दिसतंय की, डायरेक्टर बदलला असला तरी देखील सिनेमाचा सस्पेंस कायम आहे.

Read More