Marathi News> मनोरंजन
Advertisement

'रेड 2' चित्रपट 'छावा'ला मागे टाकणार? फक्त 3 दिवसात बजेट वसूल, बनवले 13 रेकॉर्ड

अजय देवगनच्या 'रेड 2' चित्रपटाने अवघ्या 6 दिवसांमध्ये हे 4 चित्रपट सोडून बाकी सर्व चित्रपटांना मागे टाकलं आहे. चित्रपटाने किती कमाई केली? जाणून घ्या सविस्तर

'रेड 2' चित्रपट 'छावा'ला मागे टाकणार? फक्त 3 दिवसात बजेट वसूल, बनवले 13 रेकॉर्ड
Raid 2 Box Office Collection Day 6: बॉलिवूड अभिनेता अजय देवगनचा 'रेड 2' चित्र पट 1 मे रोजी प्रदर्शित झाला आहे. तेव्हा बॉक्स ऑफिसवर 'जाट' आणि 'केसरी 2' हे चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करत होते. याच दिवशी साउथचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते. सूर्याचा 'रेट्'रो आणि नानीचा 'हिट द थर्ड केस'. एकाच दिवशी प्रदर्शित झालेल्या या दोन्ही चित्रपटांचा 'रेड 2'च्या कलेक्शनवर काहीच परिणाम झाला नाही. 'रेड 2' चित्रपटाची कमाई मोठ्या प्रमाणात सुरु होती. अशातच चित्रपटाने अनेक रेकॉर्ड देखील मोडले आहेत. 
 
'रेड 2' चित्रपट प्रदर्शित होऊन 6 दिवस पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत या चित्रपटाने किती कमाई केली आहे आणि 2025 मध्ये या चित्रपटाने किती रेकॉर्ड मोडले आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत. 
 
'रेड 2' चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन
 
मिडिया रिपोर्टनुसार, अजय देवगन आणि रितेश देशमुख यांच्या 'रेड 2' चित्रपटाने पहिल्या दिवशी 19.71 कोटी रुपयांची कमाई केली. यानंतर चित्रपटाने दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी 13.5 कोटी आणि 18.55 कोटी रुपयांची कमाई केली. चौथ्या दिवशी चित्रपटाने सर्वात जास्त कमाई केली. चित्रपटाने चौथ्या दिवशी 22.52 कोटी रुपयांची कमाई केली. तर पाचव्या दिवशी 7.47 कोटी रुपयांची कमाई केली. आतापर्यंत या चित्रपटाने 81.30 कोटी रुपयांची कमाई केली. 
 
Scnilc च्या रिपोर्टनुसार, आज दुपारी 4 वाजेपर्यंत 'रेड 2' चित्रपटाने 2.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाचे एकूण कलेक्शन हे 83.35 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. आजचे आकडे हे अंतिम नाहीत. यामध्ये बदल होऊ शकतो. 
 
13 चित्रपटांना टाकले मागे
 
Scnilc च्या मते, अक्षय कुमारच्या 'केसरी 2' चित्रपटाने 82 कोटी रुपये कमावले आहेत. हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर सुरु आहे. चित्रपटाची कमाई लाखोंपर्यंत मर्यादित आहे. अशातच अजय देवगनच्या चित्रपटाने 'केसरी 2' चित्रपटाचा विक्रम मोडला आहे. त्यासोबतच सनी देओलच्या 'जाट' चित्रपटाने 89 कोटी रुपयांची कमाई केली आहे. फक्त 'जाट', 'छावा', 'सिकंदर' आणि 'स्काई फोर्स' चित्रपट सोडले तर 'रेड 2' चित्रपटाने यावर्षी प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांना कलेक्शनच्या बाबतीत मागे टाकले आहे. 
 
आजाद, इमरजेंसी, मेरे हसबैंड की बीवी, क्रेजी, सुपरबॉयज ऑफ मालेगांव, द डिप्लोमैट, लवयापा, बैडऐस रविकुमार, द भूतनी, देवा, फतेह आणि फुले नंतर आता केसरी 2 चित्रपटासह 13 चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. 
Read More