Ajay Devgn's Son : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण हा गेल्या बऱ्याच काळापासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. अजय देवगणच्या पावलावर पाऊल ठेवत त्याचा मुलगा युगनं सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. पण त्यानं मोठ्या पडद्यावर अभिनय केला नसून त्यानं अजय देवगणसोबत 'कराटे किड: लेजेंड्स' मधून सिने क्षेत्रात पदार्पण केलं आहे. युगनं वयाच्या 14 व्या वर्षी मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केलं आहे पण आतापर्यंत तो स्क्रीनवर आलेला नाही. या सगळ्यात आता अजय देवगण आणि युगचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये तो अजय देवगणच्या अॅक्शन सीन आणि तो मोठा स्टार आहे हे कधी कळलं याविषयी बोलताना दिसतोय.
अजय देवगण आणि त्यांचा मुलगा युग हे दोघं यावेळी या चित्रपटाच्या प्रेस कॉन्फरन्सला पोहोचले होते. त्या दोघांनी या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला डब केलं आहे आणि त्यांच्या चाहत्यांना अजय देवगण आणि आणि काजोलचा मुलगा युगविषयी जाणून घ्यायची उत्सुकता आहे. कार्यक्रमा दरम्यान, युगला सिंघमचा डायलॉग ऐकवायला सांगितला. त्यानंतर त्याला विचारण्यात आलं की त्यानं कधी अजय देवगणचा कोणता सीन पाहिला आणि त्यानंतर तो कॉपी केला किंवा त्याला कधी कळलं की त्याचे वडील स्टार आहेत. तर अजयचे अॅक्शन सीन कॉपी करण्यावर उत्तर देत युग म्हणाला, मी नेहमीच त्याचे सीन हे कॉपी करत असतो तर अजय उत्तर देत म्हणाला की 'हो, तो नेहमीच ते कॉपी करत मला ट्रोल करतो, माझी खिल्ली उडवत असतो.' तर यावर उत्तर देत यूग, 'नाही मी असं करत नाही. तो खोटं बोलतोय.'
अजय हा स्टार आहे हे कधी लक्षात आलं याविषयी बोलताना युग म्हणाला, 'मला सगळ्यात आधी तर समजलंच नाही, पण नंतर लक्षात आलं की माझे वडील स्टार आहेत. पण महत्त्वाचं म्हणजे माझा या गोष्टीवर विश्वासच बसत नाही.'
या कार्यक्रमात अजय देवगणनं सांगितलं की त्याला त्याच्या मुलानं म्हणजेच युगनं 'कराटे किड: लेजेंड्स' मध्ये काम करण्यावर गर्व आहे. अजयनं या चित्रपटातील 'चान' या भूमिकेसाठी डबिंग केली आहे तर युगनं 'वांग' या भूमिकेसाठी डबिंग केलं आहे. त्यानं सांगितलं की युगनं डबिंग शुरु केली तेव्हा चित्रपटाच्या टीमनं त्याला सांगितलं की तो रिहर्सलमध्ये त्याची काही गाणी वापरतोय.