Marathi News> मनोरंजन
Advertisement

अजिंक्यला फाईट सिन शूट करताना झाली दुखापत

 जिथे मराठी तिथे झी मराठी या धोरणाला केंद्रस्थानी ठेवून झी मराठी ही नुसती वाहिनी राहिलेली नसून ती प्रत्येक मराठी कुटुंबाचा एक अविभाज्य घटकच बनली आहे.

अजिंक्यला फाईट सिन शूट करताना झाली दुखापत

मुंबई : जिथे मराठी तिथे झी मराठी या धोरणाला केंद्रस्थानी ठेवून झी मराठी ही नुसती वाहिनी राहिलेली नसून ती प्रत्येक मराठी कुटुंबाचा एक अविभाज्य घटकच बनली आहे.

झी मराठीवरी लोकप्रिय मालिका 'लागीर झालं जी' ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. अज्या आणि शीतली सोबत मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलं आहे. या मालिकेत प्रेक्षकांना एक मोठा ट्विस्ट पहायला मिळणार आहे. याआधी मालिकेत प्रेक्षकांनी पाहिले की अजिंक्य शीतलला लग्नाची मागणी घालतो, त्यांच्या नात्या विषयी जेव्हा हर्षवर्धनला कळते तेव्हा गोष्टी वेगळ्याच थराला जाऊन पोचतात.

हर्षवर्धनचे शीतलवरील एकतर्फी प्रेम असल्यामुळे जेव्हा त्याला शीतल आणि अजिंक्यच्या प्रेमप्रकरणाबद्दल कळते तेव्हा त्याचा राग अनावर होतो आणि अजिंक्यला तो मारण्यासाठी गुंड पाठवतो.  भारतीय सेनेत भरती झालेला आपला अजिंक्य ह्या सगळ्याला कसा समोर जातो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ह्यातून अजिंक्य आणि शीतलच्या प्रेमाला वेगळी कलाटणी मिळणार का? यासाठी तुम्हाला पाहावा लागणार आहे ‘लागिर झालं जी’ चा हा भाग.

 प्रेक्षक अजिंक्यला या गुंडांशी दोन हात करताना पाहू शकणार आहेत. मार्शल आर्टमध्ये एक्स्पर्टस असलेल्या विकास आणि राकेश या फाईट मास्टर्सच्या देखरेखीखाली हा फाइट सिक्वेन्स चित्रीत करण्यात आला आहे आणि त्यांनी अजिंक्याला या सिक्वेन्ससाठी योग्य प्रशिक्षण दिले आहे. फाईट सिक्वेन्स शूट करताना अजिंक्यला अनेक ठिकाणी खरचटले होते पण तरीही त्याने दुखापतीकडे लक्ष न देता मोठ्या जिद्दीने पहाटे ४ वाजे पर्यंत फाईट सिक्वेन्सचे चित्रीकरण पूर्ण केले.   
 
लागीर झालं जी मधला पहिला फाइट सीन पहायला विसरू नका २६ मार्च संध्याकाळी ७ वाजता फक्त झी मराठी वर

Read More