Marathi News> मनोरंजन
Advertisement

एकदाच 'या' व्यक्तीसोबत ट्रिप केली अन्... अभिनेता Ajith Kumar नं भेट दिली 12.5 लाख रुपयांची बाईक

Ajith Kumar : अजित कुमार यांनी एका व्यक्तीला चक्क 12.5 लाख रुपयांची बाईक भेट केली आहे. त्यानं भेट केलेली ही बाईक चर्चेचा विषय ठरली आहे. सध्या अजित कुमार त्यांच्या वर्ल्ड बाईक राऊड टूरचा आनंद घेत आहेत. या ट्रिपचे त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

एकदाच 'या' व्यक्तीसोबत ट्रिप केली अन्... अभिनेता Ajith Kumar नं भेट दिली 12.5 लाख रुपयांची बाईक

Ajith Kumar : दाक्षिणात्य कलाकार अभिनेता अजित कुमार यांची चांगलीच लोकप्रियता आहे. अजित पवार सध्या त्याच्या वर्ल्ड बाइक टूरवर आहे आणि आता त्या सगळ्याचा ते आनंद घेत आहेत. अजित आता जगाच्या कोणत्या टोकावर आहेत असा प्रश्न तुम्हाला असेल तर ते नेपाळमध्ये आहेत. पण सध्या ते चर्चेत असण्याचं कारण त्यांची ही नेपाळ ट्रिप नाही तर त्यांनी त्यांच्या एका मित्राला भेट म्हणून दिलेली एक बाईक आहे. तर अजित यांनी त्यांच्या मित्राला भेट म्हणून दिलेल्या या बाईकची किंमत ही 12.5 लाख रुपये आहे. एखाद्याचं मन हे दातृत्वानं किती भरलेलं असतं याचं हे उत्तम उदाहरण आहे, असं म्हणायला हरकत नाही. 

अजित कुमार यांनी फक्त भारतात ट्रिप केली नाही तर नेपाळ, भुतान आणि युरोपच्या काही भागात प्रवास करुन आले आहे. अजित यांनी सुगत सतपति यांना ही 12.5 लाख रुपयाची बाईक भेट म्हणून दिली आहे. आता अनेकांना प्रश्न असेल की अजित यांनी सुगत सतपतिला ही बाईक का म्हणून भेट केली आहे. तर त्याचे कारण असे आहे की सुगत सतपतिनं अजित यांनी नेपाळच्या त्यांच्या या ट्रिप अरेंज करण्यासाठी मदत केली होती. त्यानं खूश होऊन अजित यांनी सुगत सतपति यांना ही बाईक भेट केली आहे.  त्याचे फोटो आणि व्हिडीओ सुगत सतपतिनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. त्यांच्या या फोटोंच

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सुगतनं इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर करत कॅप्शन दिले की 2022 या वर्षाचा शेवट माझ्यासाठी खूप लकी ठरला. मी अजित कुमार यांना भेटलो आणि ते दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकार आहेत. त्यांना बाईक सुद्धा प्रचंड आवडतात. तर एडव्हेंचर बाईक ते खूप चांगल्या प्रकारे चालवतात. मी त्यांच्यासाठी नॉर्थ ईस्ट टूर ऑर्गनाइज केली होती. मी त्यांच्यासोबत असताना माझी जुनी Duke 390 चालवत होतो. त्यांना राइड दिल्यानंतर त्यांनी मला प्रॉमिस केलं की माझ्यासोबत आणखी एक टूर करतील. तर ही टूर आम्ही 6 मे रोजी पूर्ण केली. 

हेही वाचा : Ashish Vidyarthi यांच्या दुसऱ्या लग्नानंतर पहिल्या पत्नीची प्रतिक्रिया व्हायरल; अखेर त्या व्यक्त झाल्या...

पुढे तो म्हणाला, 'ही F850gs माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ही माझ्यासाठी एका बाईपेक्षा पण जास्त महत्त्वाची आहे. ही मला अजित कुमार यांनी भेट केली आहे. त्यांनी ही बाईक भेट देताना एकदाही विचार केला नाही. त्यांची इच्छा होती की माझ्याकडे ही सुपरबाईक असायला हवी. या व्यक्तीचं माझ्या आयुष्यात काय महत्त्व आहे हे सांगण्यासाठी माझे शब्द अपूरे पडतील. ते माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. जे नेहमीच माझ्या चांगल्याच विचार करतात. अन्ना तुम्ही बेस्ट आहात.'

Read More