Marathi News> मनोरंजन
Advertisement

Ranbir च्या पत्नीवर त्याचा 'हा 'अभिनेता मित्रही फिदा; म्हणाला....

आलिया आपल्या पहिल्या हॉलीवूड डेब्यू फिल्मसाठी लंडनवरून भारतात परतली आहे.

Ranbir च्या पत्नीवर त्याचा 'हा 'अभिनेता मित्रही फिदा; म्हणाला....

Alia bhatt and Arjun Kapoor: सध्या चर्चा आहे ती आलिया भट्टच्या प्रेगंन्सीची. पण त्यातूनही सध्या ती तिच्या प्रेगंन्सी फोटोशूटमुळे अधिकच चर्चेत आहे. आलिया आणि रणबीर नुकतेच आपापले शुटिंग संपवून भारतात परत आले आहेत त्यातून त्या दोघांनी दिलेल्या गूडन्यूजमुळे तर ते दोघं अधिकच चर्चेत आले आहेत. रणबीर श्रद्धा कपूरसह आगामी चित्रपटातून दिसणार आहे. ते दोघंही नुकतेच स्पेनवरून परतले आहेत. तर आलिया आपल्या पहिल्या हॉलीवूड डेब्यू फिल्मसाठी लंडनवरून भारतात परतली आहे. आपल्या प्रेग्नंंट पत्नीला एअरपोर्टवरून परत आणण्यासाठीही रणबीर तिला आणायला गेला होता तेव्हा ते दोघं पहिल्यांदा स्पॉट झाले होते. 

नुकतंच आलियाने तिच्या इन्टाग्राम पेजवरून एक हॉट फोटोशूट शेअर केलं आहे. सध्या आलिया आपल्या आगामी 'डार्लिंग्स' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तेव्हा सध्या आलिया आपल्या 'डार्लिंग' मुडमध्ये आहे. असंच एक फोटोशूट आलियाने शेअर केलं असून त्यावर अनेकांच्या कमेंट्स आल्या आहेत ज्यात सगळ्यांनीच आलियाच्या या फोटोशूटवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

पण त्यात एकाची कमेंट मात्र लक्ष वेधून घेते आहे. रणबीर कपूरची नाही तर चक्क अर्जून कपूरने केलेली कमेंट सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेते आहे. या कमेंटमध्ये अर्जूनने आलियाच्या फोटोशूटचं कौतुक तर केलं आहेच पण त्याचसोबत त्याने तिच्या जबड्याचे कौतुक केले आहे. तो म्हणतो, this jawline in preganacy kamaal hai Alia Bhatt... too gwed! अशी कमेंट करून त्यांनी चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वळवले आहे. 

अर्जूनच्या या कमेंटवर चाहते घायाळ झाले असून त्यांनीही हार्ट आणि इमोजी शेअर केले आहेत. 

fallbacks

अर्जून कपूर आणि आलिया भट्ट हिने 2 states या चित्रपटातून एकत्र काम केलं आहे. त्यातही त्यांनीही बरेच इन्टिमेट सीन्स दिले होते. आता अर्जून कपूर लवकरच 'एक व्हिलन रिटर्न' या चित्रपटातून दिसणार आहे. आणि आलिया भट्ट हिची निर्मिती असलेला 'डार्लिंग' हा सिनेमाही लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. 

Read More