Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्याचं दुर्भाग्य.. असता कपूर कुटुंबाचा जावई, पण अभिनेत्रीच्या आईची अट...

कपूर कुटुंबाचा जावई असता 'हा' प्रसिद्ध अभिनेता, अनेक अफेअरनंतरही राहतो एकटा...   

अभिनेत्याचं दुर्भाग्य.. असता कपूर कुटुंबाचा जावई, पण अभिनेत्रीच्या आईची अट...

मुंबई : इंडस्ट्रीध्ये सर्वात जास्त चर्चेत असणारा विषय म्हणजे सेलिब्रिटींचं खासगी आयुष्य... चाहत्यांना देखील त्यांच्या आवडत्या कलाकाराच्या आयुष्यात नक्की काय सुरू आहे, त्याच्या आयुष्यातील खास व्यक्ती कोण आहे...  असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण होत असतात. एक काळ असा होता, जेव्हा अभिनेता अक्षय खन्ना यशाच्या उच्च शिखरावर होता. बॉक्स ऑफिसवर त्याचे एकापेक्षा एक सिनेमे हीट ठरत होते. 

त्यामुळे त्याच्या मागे अनेक मुलींची रांग देखील होती. एवढंच नाही अनेक अभिनेत्रींसोबत अक्षयचं नाव देखील जुळलं. पण करियच्या उच्च शिखरावर असताना कपूर कुटुंबाकडून अक्षयला लग्नाची मागणी घालण्यात आली.

रणधीर कपूर यांना त्यांची मुलगी करिश्मा कपूरचं लग्न अक्षयसोबत करायचे होते, म्हणून त्यांनी अक्षयचे वडील विनोद खन्ना यांच्या घरी अक्षय आणि करिष्माच्या लग्नाची मागणी घातली. पण करिष्माची आई बबीता यांनी दोघांचं लग्न मान्य नव्हतं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कारण करिश्मा देखील तेव्हा यशाच्या उच्च शिखरावर होती. तेव्हा जर करिष्मा आणि अक्षयचं लग्न झालं असतं, तर करिश्माच्या करियरला ब्रेक लागला असता. असं मत करिश्माच्या आईचं होतं. 

जर तेव्हा करिश्माच्या आईने लग्नाला होकार दिला असता. तर आज अक्षय खन्ना कपूर कुटुंबाचा जावई असता. पण तसं होवू शकलं नाही आणि प्रसिद्ध अभिनेता असूनही तो एकटं आयुष्य जगत आहे. 

Read More