Marathi News> मनोरंजन
Advertisement

अनोख्या अंदाजात खिलाडी कुमारने स्वीकारले #10YearsChallenge

#10YearsChallenge स्वीकारत आपल्या नवीन सिनेमाचा फोटो शेअर केला.

अनोख्या अंदाजात खिलाडी कुमारने स्वीकारले #10YearsChallenge

मुंबई: बॉलिवूडमध्ये सध्या #10YearsChallenge चे जाळे पसरले आहे. सर्वच कलाकारमंडळी #10YearsChallenge स्वीकारत आहेत. अभिनेता अक्षय कुमारने सुद्धा #10YearsChallenge स्वीकारत आपल्या नवीन सिनेमाचा फोटो शेअर केला. 'गुड न्यूज' सिनेमाच्या पहिल्या दिवसाचा फोटो अक्षयने शेयर केला आहे. या फोटोमध्ये करिना कपूर सुद्धा दिसत आहे. या वर्षाखेरीज 'गुड न्यूज' सिनेमा सिनेमागृहात दाखल होणार आहे. 

 

 

१० वर्षांपूर्वी अक्षय अणि करिनाचा 'कमबख्त इश्क' सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्याच सिनेमातील एक फोटो आणि 'गुड न्यूज' सिनेमातील एक फोटो अशा दोन फोटोंचे कोलाज तयार करुन अक्षयने त्याच्या इंन्स्टाग्रामवर अकाऊंटवर पोस्ट केले. या दोन फोटोंमध्ये बरेच साम्य दिसत आहे

अक्षय कुमार आणि करिना कपूरचा 'गुड न्यूज' सिनेमा १९ जुलै २०१९ रोजी प्रदर्शित होणार होता. पण आता ६ डिसेंबर रोजी सिमेना प्रदर्शित होणार आहे. दिल्लीमध्ये राहणाऱ्या एका जोडप्यावर आधारित हा सिनेमा असणार आहे. हे जोडपे बाळ होण्यसाठी प्रयत्न करत आहेत आणि त्याचवेळी पंजाबी जोडपे त्यांच्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावतात असल्याचे सिनेमात दाखवले आहे. अक्षय कुमारचे केसरी, मिशन मंगल अणि हाउसफुल 4 सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  केसरी सिनेमात अक्षय एका हवलदाराच्या 
भूमीकेत दिसणार आहे. सिनेमा २१ मार्चला प्रदर्शित होणार आहे. अनुराग सिंह चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

Read More