Marathi News> मनोरंजन
Advertisement

टायगर श्रॉफचा 'बागी २' सिनेमा पाहून अक्षय कुमार, ह्रतिक रोशन हैराण, सेलिब्रेटींनी म्हटलं...

अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पाटनी यांच्या 'बागी २' सिनेमाने बॉक्सऑफिसवर जबरदस्त कमाई करण्यास सुरुवात केलीय. प्रदर्शित होताच या सिनेमाने कमाईचा एक रेकॉर्डच केला आहे. 'बागी २' हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची सिनेमागृहात गर्दी होत आहे.

टायगर श्रॉफचा 'बागी २' सिनेमा पाहून अक्षय कुमार, ह्रतिक रोशन हैराण, सेलिब्रेटींनी म्हटलं...

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पाटनी यांच्या 'बागी २' सिनेमाने बॉक्सऑफिसवर जबरदस्त कमाई करण्यास सुरुवात केलीय. प्रदर्शित होताच या सिनेमाने कमाईचा एक रेकॉर्डच केला आहे. 'बागी २' हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची सिनेमागृहात गर्दी होत आहे.

केवळ सामान्य नागरिकच नाही तर, बॉलिवूडमधील टॉप स्टार अक्षय कुमार आणि ह्रतिक रोशनही टायगर श्रॉफच्या अॅक्शनने घायाळ झाले आहेत.

'बागी २' सिनेमा पाहिल्यानंतर बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार याने ट्विट केलं आहे. ट्विट करत अक्षयने म्हटलं, "बॉलिवूड आता गर्वाने बोलू शकतं की त्यांच्याकडेही आपला 'टोनी जा' आहे."

टोनी जा एक आंतरराष्ट्रीय मार्शियल आर्ट्स अॅक्टर आहे. टोनी जा एक मार्शल आर्टिस्ट, अभिनेता, अॅक्शन कोरियोग्राफर, स्टंटमॅन, निर्देशक आहे. अभिनेता अक्षय कुमारने आपल्या ट्विटच्या माध्यमातून टायगर श्रॉफची तुलना टोनी जा याच्यासोबत केली आहे.

अभिनेता अक्षय कुमारने केलेल्या या कौतुकास्पद ट्विटनंतर टायगर श्रॉफनेही ट्विट केलं आहे. टायगरने ट्विट करत अक्षय कुमारचे आभार मानले आहेत.

टायगर श्रॉफचा परफॉर्मन्स पाहून केवळ अक्षय कुमारच नाही तर ह्रतिक रोशन, अर्जुन कपूर, वरुण धवन सारख्या सेलिब्रेटींनीही बागी २ सिनेमाचं आणि टायगरचं कौतुक केलं आहे.

टायगर श्रॉफचा 'बागी २' सिनेमा पाहून अक्षय कुमार, ह्रतिक रोशन हैराण

Read More