Marathi News> मनोरंजन
Advertisement

अक्षयकुमारने नाइलाजाने केलं 'द कश्मीर फाइल्स'चं कौतूक' डायरेक्टर विवेक अग्निहोत्रीचा खिलाड़ी कुमारवर आरोप

विवेक अग्निहोत्रीचा द काश्मीर फाईल्स हा २०२२ च्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे.

अक्षयकुमारने नाइलाजाने केलं 'द कश्मीर फाइल्स'चं कौतूक' डायरेक्टर विवेक अग्निहोत्रीचा खिलाड़ी कुमारवर आरोप

मुंबई : विवेक अग्निहोत्रीचा द काश्मीर फाईल्स हा २०२२ च्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाची कथा 1990 च्या दशकात काश्मिरी पंडितांच्या पलायनावर आधारित आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या पहिल्या दिवसाचं कलेक्शन काही खास नव्हतं. मात्र चित्रपटाची वर्ड टू माउथ पब्लिसिटी सुरू होताच तिकीट खिडकीवरही गर्दी वाढू लागली. काश्मीर फाइल्सने बॉलिवूडचे दोन भाग केले.

त्यावेळीही सुपरस्टार अक्षय कुमारने या चित्रपटाचं कौतुक केलं होतं. ज्यावर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने व्हिडिओ शेअर करत आभार मानले होते. मात्र आता त्याच विवेक अग्निहोत्रीने अक्षय कुमारवर आरोप केले आहेत.

अक्षय कुमारवर आरोप
विवेक अग्निहोत्रीने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, मला या चित्रपटासाठी बॉलिवूडकडून पाठिंबा मिळाला नाही. विवेक पुढे म्हणाला की, अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे' फ्लॉप ठरला, त्यामुळे त्याला 'द कश्मीर फाइल्स'चं खोटं कौतुक करावं लागलं. यादरम्यान आरजे रौनक म्हणाला, 'बॉलीवूडमधील सगळ्या लोकांनी तुमच्या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.' तेव्हा विवेक अग्निहोत्री म्हणाला, 'जसं… नाव सांगा.'

नाईलाजाने केलं सिनेमाचं कौतूक
आरजे रौनक पुढे म्हणाला, 'अक्षय कुमारने प्रशंसा केली होती.' विवेक उत्तर देत म्हणाला, 'वो तो मजबूरी में, क्या बोलेगा यार, जेव्हा शंभर लोकं समोर उभे राहून प्रश्न विचारतील की तुमचा चित्रपट नाही चालला. काश्मीर फाइल्स चालला नाही'. मी भोपाळमध्ये एका कार्यक्रमात होतो. त्यामुळे त्याला बोलायचं होतं. विवेक म्हणाला, 'मागे कोणी स्तुती केली नाही. होत असं की, तो त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जायचा आणि काश्मीर फाईलवर माध्यमांनी प्रश्न विचारलं तर त्याला उत्तर द्यावं लागायचा.

Read More