Marathi News> मनोरंजन
Advertisement

इंधन दरवाढीवरून नेटीझन्सचा सेलिब्रिटींवर भडका

काय विचारला जाब

इंधन दरवाढीवरून नेटीझन्सचा सेलिब्रिटींवर भडका

मुंबई : इंधन दरवाढीवरून आगडोंब उसळला असताना, कायम टिव टिव करणाऱ्या सेलिब्रिटींनाही आता त्याची धग सोसावी लागत आहे. काँग्रेस सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेल दरवाढ झाल्यानंतर सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी ट्वीट करून नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता मोदी सरकारच्या काळात पेट्रोलच्या किंमती ८५ रूपयांवर जाऊन पोहोचल्या असताना, हे सेलिब्रिटी कुठं तोंड लपवून बसलेत? असा हल्ला नेटिझन्सनी विचारला आहे. 

fallbacks

पेट्रोलची किंमत ७५ रूपयांवर गेल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी एक जोक ट्विट केला  होता. पंप चालक विचारतो, कितीचं पेट्रोल टाकू? त्यावर मुंबईकराचं उत्तर - दोन-चार रूपयाचं पेट्रोल कारवर शिंपड बाबा... जाळून टाकतो कार... शिवाय पेट्रोलचा वास किती छान आहे, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला होता. आता बच्चनना पेट्रोलचा वास येत नाही का? अशी विचारणा त्यांना ट्रोल करणारे करत आहेत.

fallbacks

तर आता सायकली बाहेर काढायची वेळ आलीय, असं ट्वीट अक्षय कुमारनं केलं होतं. त्यावर ट्रोलिंग सुरू झाल्यानंतर अक्षयनं ते जुनं ट्वीटचं डिलीट करून टाकलं.

Read More