Marathi News> मनोरंजन
Advertisement

अक्षय कुमारला विचारलं, तू सरकारची इतकी बाजू का घेतो?; अभिनेत्यानं दिलं सडेतोड उत्तर

Akshay Kumar Modi Bhakta Comment: अक्षय कुमारची अनेकदा चर्चा रंगलेली असते. अनेकदा त्याला सोशल मीडियावरून 'मोदी भक्त' म्हणून ट्रोलही करण्यात येते. तो कायमच सरकारची बाजू घेतो यावरूनही त्याला ट्रोल करण्यात येते यावेळी त्यानं यावर एका मुलाखतीतून स्पष्टीकरण दिले आहे. 

अक्षय कुमारला विचारलं, तू सरकारची इतकी बाजू का घेतो?; अभिनेत्यानं दिलं सडेतोड उत्तर

Akshay Kumar Modi Bhakta Comment: राजकारण आणि कलाकारांचे जग समांतर चालू लागलं आहे की काय असं चित्र सध्या दिसू लागलं आहे. त्यातून सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अक्षय कुमारची. हा अभिनेता 'मोदी भक्त' आहे. म्हणून त्याच्यावर कायमच टीका केली जाते. परंतु सध्या त्यानं दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं आपल्यावरून चर्चिल्या जाणाऱ्या या सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण दिले आहे. मध्यंतरी त्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दीर्घ मुलाखत घेतली होती.

त्यामुळे त्याची जोरात चर्चा होती. त्यानंतर तो नरेंद्र मोदींचा भक्त आहे अस म्हणतं त्याला ट्रोलही करण्यात आले होते. परंतु आता यावर त्यानं स्पष्टीकरण दिले आहे. 'इंडिया टूडे'ला दिलेल्या मुलाखतीत त्यानं अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. अक्षय कुमार अनेकदा अनेक मुद्द्यांवरती स्पष्ट बोलतो अथवा बोलतच नाही. परंतु त्याचे स्पष्ट उत्तर हे फारच सामर्थ्यवान असते असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. 

आता या लेखातून आपण जाणून घेऊया की नक्की तो काय म्हणाला आहे. यावेळी अक्षय कुमारला स्पष्टपणे विचारण्यात आले की, तूम्ही नेहमीच सरकारची बाजू घेता आणि तुम्हाला 'मोदी भक्त' असे म्हटले जाते. मध्यंतरी त्यानं नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली होती तेव्हाही तो ट्रोल झाला होता. यावर तो म्हणतो, ''“मला ते माणूस म्हणून कसे आहेत हे जाणून घ्यायची उत्सुकता होती. त्यामुळेच ते घडयाळ एका विशिष्ट पद्धतीनेच का घालतात? त्यांच्या बँकेत किती पैसे आहेत? असेच प्रश्न मी त्यावेळी त्यांना विचारले. मला त्यांना पॉलिसीजविषयी विचारायचंच नव्हतं.” त्यावेळी प्रधानमंत्री ऑफिसकडून अक्षयला या प्रश्नांबद्दल काहीही सूचना देण्यात आलेल्या नव्हत्या असंही तो म्हणाला. 

हेही वाचा : VIDEO: बिकीनीवर नेसली साडी! मिताली मयेकरवर नेटकरी भडकले; प्रत्युत्तर देत म्हणाली, 'काहीही घालीन पण...'

पुढे तो म्हणाला की, ''अनेक लोकं असं म्हणतात की, बरीच लोकं म्हणतात की त्यांनी स्वच्छ भारत अभियान प्रमोट केले आणि मग मी 'टॉयलेट एक प्रेमकथा' हा सिनेमा केला. त्यानंतर मी मार्स मिशनवरती 'मिशन मंगल' केला असं म्हटलं गेलं आहे. असं नाही होतं... मी 'एअरलिफ्ट' हा चित्रपटही बनला आहे. तेव्हा तर कॉंग्रेसचं सरकार होतं. त्याबद्दल कोणीच बोललं नाही. आता हा जो माझा सिनेमा आहे 'मिशन रानीगंज' यातला सेट तर कॉंग्रेसच्या काळातला आहे. असंही काहीही नाही की कोणी सत्तेत आहे त्यांचे सिनेमे मी करतो आहे. त्यामुळे आपण आपल्या देशासाठी काय करतोय हे महत्त्वाचं आहे. भारत-कॅनडा संबंधावरही त्यानं भाष्य केले. 

Read More