Marathi News> मनोरंजन
Advertisement

... म्हणून Akshay Kumarला पहील्या गर्लफ्रेंडने केलं रिजेक्ट

जाणून घ्या काय आहे कारण...  

... म्हणून Akshay Kumarला पहील्या गर्लफ्रेंडने केलं रिजेक्ट

मुंबई : बॉलिवूडच्या झगमगत्या विश्वात रोजच अनेक नाते तुटतात तर अनेक नव्या जोड्या कानावर येतात. कालांतरनाने तुटलेल्या नात्याच्या चर्चा कायम वाऱ्यासारख्या पसरत असतात. अशात पहिल्या प्रेमाची गोष्ट निघाली तर प्रत्येक चाहता त्यांच्या आवडत्या कलाकाराच्या पहिल्या प्रेमाची कथा ऐकायला आणि जाणून घ्यायला  उत्सुक असतो. आता सध्या चर्चा रंगत आहे ती म्हणजे अभिनेता अक्षय कुमारच्या पहिल्या प्रेमाची. अक्षयला त्याच्या पहिल्या गर्लफ्रेंडने चक्क नकार दिला. किंबहुना त्याला कारण देखील तसचं आहे. 

खुद्द अक्षयने त्याच्या पहिल्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. त्याकाळी अक्षय अत्यंत लाजाळू असल्यामुऴे त्याला त्याची पहिली गर्लफ्रेंड सोडून गेली. दरम्यान विनोदवीर कपिल शर्माच्या शोमध्ये अक्षयला त्याच्या पहिल्या प्रेमाची आठवण आली. 'हाउसफुल 4' चित्रपटाच्या प्रमोशन वेळी अक्षयने त्य़ाची पहिली डेट आणि गर्लफ्रेंडबद्दल वक्तव्य केलं, 

तो म्हणाला, 'मी तिच्या सोबत जवळपास चारवेळा डेटवर गेलो, हॉचेलमध्ये देखील गेलो. मात्र त्यानंतर तिने लगेच मला रिजेक्ट केलं.' सध्या अक्षयचा हा जुना व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत  आहे. 

सांगायचं झालं तर काही दिवसांपूर्वी अक्षयचा 'लक्ष्मी' चित्रपट सोशल मीडियावर प्रदर्शित झाला. 'लक्ष्मी' चित्रपटाच्या माध्यामातून त्याने डिजिटल मध्यमांत पदार्पण केलं. येणाऱ्या काही दिवसांत तो 'सूर्यवंशी', 'बच्चन पांडे', 'पृथवीराज', 'अतरंगी रे', ' बॅलबॉटम' या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

Read More