Akshay Kumar Viral Video : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ येत्या आगामी 'बडे मियाँ छोटे मियाँ' या (Bade miyan Chote miyan) चित्रपटात दिसणार आहेत. अक्षय आणि टायगर (Tiger shroff) पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करताना दिसणार असल्याने आता सर्वांची उत्सुकता देखील वाढली आहे. हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. नुकतंच 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या निर्मात्यांनी या चित्रपटाचा टायटल ट्रॅक रिलीज केला होता. अशातच आता अक्षय (Akshay Kumar) आणि टायगर या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्थ असल्याचं पहायला मिळतंय. त्यातच आता लखनऊमध्ये प्रमोशनसाठी झालेल्या एका कार्यक्रमात मोठा गोंधळ उडाल्याचं समोर आलं आहे. त्याचा व्हिडीओ (Viral Video) देखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
'बडे मियाँ छोटे मियाँ'बद्दल प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अलीकडेच, चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एका वृत्तपत्राचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. त्यावेळी 'बडे मियाँ छोटे मियाँ'ची टीम 26 फेब्रुवारीला लखनऊमध्ये पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं. लखनऊमध्ये जोरदार प्रदर्शन झालं. अक्षय कुमारने यावेळी एका मोकळ्या मैदानात स्टंट देखील करून दाखवला. मात्र, कार्यक्रम संपत असताना मोठा गोंधळ उडाल्याचं समोर आलंय. एवढंच नाही तर कार्यक्रमात दगडफेक देखील झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.
लखनऊमधील कार्यक्रमात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टेजवर बडे मियाँ छोटे मियाँच्या टायटल ट्रॅकवर डान्स करताना दिसले. तर अक्षय कुमारने लाईव्ह स्टंट देखील करून दाखवला. त्यावेळी लोकांना भरघोस प्रतिसाद दिल्याचं दिसून आलं. ईद यायला अजून वेळ आहे. पण त्यावेळी मी इथे राहू शकणार नाही. त्यामुळे माझ्याकडून, टायगर आणि त्याच्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा, असं म्हणत अक्षयने चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पाहा Video
That Massive Crowd Came Just To Witness The Presence Of #AkshayKumar
— (@BloodyyRaju_) February 26, 2024
Craze Kaa Baap Bolte #BadeMiyanChoteMiyan #BMCM pic.twitter.com/omzvXZ8tDG
MAN who practice his own religion piously but had no Religion Bias for any one - Wished EID to everyone in advance in Lucknow #AkshayKumar #BMCM
— AP (@AksP009) February 26, 2024
pic.twitter.com/MfEjXu9LL0
दरम्यान, 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपट एक मनोरंजक रोलरकोस्टर राइड, ॲक्शन-पॅक स्टंट्स आणि एक मनोरंजक कथा असल्याचं सांगण्यात येतंय. अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, पृथ्वीराज सुकुमारन, मानुषी छिल्लर, सोनाक्षी सिन्हा आणि अलाया एफ यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. पूजा एन्टरटेन्मेंट आणि एएझेड फिल्म्स निर्मित हा चित्रपट एप्रिलमध्ये ईदच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच 9 एप्रिलला (Bade miyan Chote miyan released date) थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.