Marathi News> मनोरंजन
Advertisement

गळ्यात हार, साजेशी साडी... आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीनं गुपचूप उरकलं लग्न? 

सध्या टीव्ही आणि बॉलीवूड इंडस्ट्रीत लग्नाचा हंगाम सुरू आहे

गळ्यात हार, साजेशी साडी... आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीनं गुपचूप उरकलं लग्न? 

मुंबई : सध्या टीव्ही आणि बॉलीवूड इंडस्ट्रीत लग्नाचा हंगाम सुरू आहे. जवळपास दररोज कोणत्या ना कोणत्या स्टारच्या लग्नाच्या बातम्या ऐकायला मिळतात. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. या सर्व बातम्यांदरम्यान मौनीचा असा एक फोटो समोर आला आहे. ज्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 

खरचं मौनीचं लग्न झालयं का?
मौनी गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ही अभिनेत्री काही दिवसांपासून दुबईतील बिझनेसमन सूरज नांबियारला डेट करत आहे. आता मौनीने नुकताच तिच्या इंस्टाग्राम पेजवर एक फोटो शेअर केला आहे. जो पाहून सगळेच थक्क झाले आहेत. हा फोटो पाहिल्यानंतर चाहते खूप गोंधळात पडत आहेत आणि विचारत आहेत की, मौनीने बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं आहे का?

जर तुमच्याही मनात असेच प्रश्न येत असतील तर मौनीने गुपचूप लग्न वैगरे काही केलेलं नाही. अभिनेत्रीने स्वतः कॅप्शनमध्ये याचा खुलासा केला आहे. पोस्ट शेअर करत मौनीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'आज - तिरुवथिरा नक्षत्र आहे... भगवान शिवाचं तारा आहे. असं मानलं जातं की, या दिवशी देवी पार्वतीने तिच्या खूप दिवसांच्या तपश्चर्येनंतर भगवान शंकर यांची भेट घेतली आणि त्यांना सहधर्म चारिणीच्या रुपात आपलं बनवलं. सत्यनारायण पूजेनंतर''

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मीडिया रिपोर्ट्नुसार, मौनी नवीन वर्षाच्या मुहूर्तावर लग्न करणार आहे. याशिवाय तिच्या लग्नाची तारीखही समोर आली आहे. जानेवारी 2022 मध्ये मौनी लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं बोललं जात आहे. तिच्या लग्नाचे विधी 25 जानेवारीपासून सुरू होऊ शकतात. त्याचबरोबर अभिनेत्रीचं लग्न  27 जानेवारीला होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Read More