Akshay Kumar Big Decision After Stuntman Raju Death: मनोरंजनसृष्टीला हारदवून टाकणारी एक दुर्घटना काही दिवसांपूर्वी घडली. एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान प्रसिद्ध स्टंटमॅन एस. एम. राजूचा मृत्यू झाला. 10 जुलै रोजी केरळमधील अलाप्पुझाजवळ विझुंथमवाडी गावात शूटिंगदरम्यान एक विचित्र अपघात घडला. राजू एका चित्रपटातील स्टंटसाठी कार चालवत होता. या कारने समोरच्या रॅम्पवरुन हवेत झेप घेणं अपेक्षित होतं. मात्र कारची एकच बाजू रॅम्पवर चढली आणि कार हवेत उडाली. हवेतच गिरक्या घेत कार जमीनीवर आपटली. या अपघातात राजू गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही बातमी समोर आल्यानंतर अनेक कलाकारांना राजूला श्रद्धांजली अर्पण केली आहे. मात्र चित्रपटांमधील आपल्या स्टंट्ससाठी ओळखला जाणारा अभिनेता बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारने सर्व स्टंटमनचा विचार करत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अक्षयने राजूच्या मृत्यूनंतर एक असे पाऊल उचलले आहे ज्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
राजूचा आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर, अक्षय कुमार सर्व स्टंटमनसाठी पुढे आला आहे. त्याने भारतातील 650 स्टंटमन आणि स्टंटवुमनचा विमा उतरवला आहे. या विमा योजनेअंतर्गत सर्व स्टंटमन आणि स्टंटवुमन्सला आरोग्य विम्यासहीत अपघात विमाही दिला जाणार आहे. ही बातमी समोर आल्यापासून अनेकांनी अक्षयच्या या निर्णयाचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. स्टंटमन राजूच्या मृत्यूनंतर शुटींगच्या ठिकाणी स्टंटमनची सुरक्षा किती असते यावरुन वाद सुरु झाला आहे. स्टंटमनच्या सुरक्षेकडे राजूच्या अपघातापूर्वी फारसं लक्ष दिलं जात नव्हतं. अर्थात यापूर्वीही स्टंटमनचे असे अपघात झाले आहेत. मात्र त्यामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्याची घटना फारच क्वचित घडते. म्हणूनच संस्टमनच्या सुरक्षेबद्दल आता अधिक चर्चा होतेना दिसतेय. स्टंटमन हे जीव धोक्यात घालून काम करतात. स्टंटमनच्या सुरक्षेसाठी योग्य सुरक्षा उपकरणे किंवा वैद्यकीय सुविधा अनेकदा सेटवर उपलब्ध नसतात.
Stunt master SM Raju dies during a high-risk car stunt on set in TN.
— The Cinprism (@TheCineprism) July 14, 2025
These are the real unsung heroes, risking life for "superstars", paid in peanuts or death. pic.twitter.com/OQ3jyyNbCa
या नव्या विमा पॉलिसीमध्ये स्टंटमन आणि स्टंटवुमनबरोबरच अॅक्शन क्रूमधील सदस्यांना आरोग्य आणि अपघात असे दोन्ही दोन्ही मिळणार आहेत. या विम्याअंतर्गत सेटवर किंवा सेटबाहेर कुठेही दुखापत झाल्यास 5 ते साडेपाच लाख रुपयांपर्यंतची कॅशलेस वैद्यकीय सुविधा दिली जाणार आहे. चित्रपट क्षेत्राकडून या विमा उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अक्षय कुमारच्या या निर्णयामुळे हजारो स्टंट कलाकारांना मोठा फायदा होणार आहे. 5 लाखांच्या हिशोबाने 650 स्टंटमन आणि स्टंटवुमनचा विमा काढला असं म्हटलं तरी 3 कोटी 25 लाखांहून अधिकचा विमा उतरवण्यात आला आहे.
अक्षय अलीकडेच 'हाऊसफुल 5' आणि 'कन्नप्पा' या चित्रपटांमध्ये दिसला. दोन्ही चित्रपटांना बॉक्स ऑफिस प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. दोन्ही चित्रपटांनी तिकीटबारीवर चांगली कमाई केली. आता लवकरच अक्षय कुमार प्रियदर्शनच्या 'हैवान' या नवीन चित्रपटात सैफ अली खानसोबतही दिसणार आहे. अलिकडेच, दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी दोन्ही स्टार्सचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अक्षय आणि सैफ हे दोघेही लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि इंग्लंडमधील कसोटी सामना पाहत असल्याचं दिसून आलं.
याआधी अक्षय आणि सैफ 'मैं खिलाडी तू अनारी', 'ये दिलगी', 'आरशू', 'तू चोर में सिपाही' आणि 'कीमत' सारख्या हिट चित्रपटांमध्ये एकत्र दिसले आहेत. 2008 मध्ये अक्षय आणि सैफ 'टशन' चित्रपटात एकत्र दिसले होते, ज्यामध्ये करीना कपूर आणि अनिल कपूर देखील होते.