Marathi News> मनोरंजन
Advertisement

अली गोनीच्या तीन शब्दांच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर खळबळ! जास्मिनबद्दलच्या कमेंटवरुन नेटकरी संतापले

टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणजे अली गोनी आणि जास्मिन भसीन. हे दोघं 'बिग बॉस 14'पासून अधिक चर्चेत आले. अलीने सोशल मीडियावर जास्मिनबद्दल असे काही लिहिले आहे की ज्यामुळे अलीवर लोक टीका करु लागले आहे.   

अली गोनीच्या तीन शब्दांच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर खळबळ! जास्मिनबद्दलच्या कमेंटवरुन नेटकरी संतापले

Jasmine Bhasin And Aly Goni: बिग बॉस 14' पासून चर्चेत आलेलं कपल म्हणजेच अली गोनी आणि जास्मिन भसीन. सुरुवातीला ते एकमेकांचे चांगले मित्र होते आणि या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. सध्या हे दोघं एकत्र राहतात आणि त्यांचं नातं सोशल मीडियावरही खुलेपणाने शेअर करतात. मात्र अली गोनीची एक इन्स्टाग्राम स्टोरी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पाहूयात नेमकं काय घडलं?

वादग्रस्त पोस्ट काय होती?
अलीने काही वेळापूर्वी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर जास्मिनचा एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोमध्ये जास्मिनने क्रॉप टॉप परिधान केला होता. फोटोसोबत अलीने लिहिलं, 'जास्मिन छपरी आहे का?' या तीन शब्दांच्या कमेंटमुळेच सोशल मीडियावर वाद निर्माण झाला. अनेक चाहत्यांना अलीचा हा प्रश्न अपमानास्पद आणि असभ्य वाटला.

fallbacks

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया: या स्टोरीनंतर काही मिनिटांतच अली गोनी ट्रोल होऊ लागला. काहींनी त्याच्या विनोदी शैलीचं समर्थन केलं, तर अनेकांनी त्याच्या भाषेवर नाराजी व्यक्त केली.

एका नेटकऱ्याने लिहिलं, 'प्रेमात असलो तरी अशी कमेंट सार्वजनिकरित्या करणं योग्य वाटत नाही.' दुसऱ्याने म्हटलं, 'ही अपमानास्पद मस्करी आहे. नात्यांमध्ये सन्मान हा आवश्यक असतो.' तर काही चाहत्यांनी अलीच्या विनोदी स्वभावाचं समर्थन करत लिहिलं, 'ते दोघं एकमेकांना चिडवत असतात. हे खूपच साधं आणि मजेतलं होतं. इतकं गंभीर घेऊ नका.'

जास्मिनने प्रतिक्रिया दिली का?
सध्या तरी जास्मिन भसीनने या वादावर थेट कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र तिनेही आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अलीचा फोटो शेअर करत त्यावर 'अली छपरी आहे का?' असं लिहिलं. यावरून स्पष्ट होतं की दोघं एकमेकांमध्ये मस्करी करत असून त्यांचा हेतू कुणालाही दुखावण्याचा नव्हता.

नात्याची पार्श्वभूमी:
अली आणि जास्मिन 'फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडी'मध्ये एकत्र दिसले होते. त्यानंतर 'बिग बॉस 14'मध्ये त्यांची केमिस्ट्री विशेष चर्चेत आली. याच शोमध्ये त्यांनी एकमेकांवरील भावना व्यक्त केल्या आणि तेव्हापासून ते एकत्र आहेत. 2023 च्या शेवटी अशी चर्चा होती की हे दोघं मुंबईत एकत्र राहण्यासाठी घर शोधत आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनीही त्यांच्या नात्याला मान्यता दिली असून, लवकरच ते लग्नाच्या बंधनात अडकू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

अली गोनीने केवळ मस्करीतून लिहिलेली ती पोस्ट काही चाहत्यांना खटकली. सोशल मीडियावर जास्मिननेही त्याच पद्धतीने अलीवर कमेंट करून हे स्पष्ट केलं की ते दोघं मजेत एकमेकांना चिडवतात. तरीही, सेलिब्रिटींनी सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर काहीही शेअर करताना अधिक जबाबदारीने वागणं आवश्यक असतं. कारण त्यांच्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष दिलं जातं आणि त्याचा अर्थ अनेकदा वेगवेगळ्या पद्धतीने घेतला जातो.

Read More