Marathi News> मनोरंजन
Advertisement

Ranbir Kapoor सोबत फिरताना आलियाचे बेबी बंप समोर, Video Viral

बॉलिवूडचं 'क्यूट कपल' रणबीर-आलिया पहिल्या बाळाच्या प्रतीक्षेत, व्हिडीओतून आलियाचे बेबी बंप समोर  

Ranbir Kapoor सोबत फिरताना आलियाचे बेबी बंप समोर, Video Viral

मुंबई : अभिनेता आलिया भट्ट आणि रणबीर कपूर त्यांच्या प्रोफेशनल लाईफमुळे नाही, तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आलियाने चाहत्यांना गूडन्यूज दिल्यामुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. आलियाने इन्स्टाग्रामवर सोनोग्राफीचा फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. सोशल मीडियावर फोटो व्हायरल होताचं फक्त चाहत्यांनीचं नाही, तर अनेक सेलिब्रिटींनी देखील तिला शुभेच्छा दिल्या. सध्या आलिया-रणबीरच्या येणाऱ्या बाळाची चर्चा तुफान रंगत आहे. 

आलियाचा लूक पाहून पुन्हा अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीच्या चर्चांनी जोर धरला आहे. सैल ड्रेसमध्ये आलिया पाहिल्यानंतर प्रत्येक जण अभिनेत्रीच्या बेबी बंपबद्दल चर्चा करत आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आता पर्यंत फक्त वेग-वेगळ्या ड्रेसमध्ये आलियाचे फोटो व्हायरल झाले. पण आता अभिनेता रणबीर आणि आलियाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्य आलियाने मरुन रंगाचा ड्रेस घातला आहे. ज्यामध्ये आलियाचे बेबी बंप दिसत आहे. पाहा व्हिडीओ... 

एक महिन्यापूर्वी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी त्यांच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. तेव्हापासून हे जोडपं त्यांच्या बाळाच्या प्लॅनिंगमुळे चर्चेत आहे. दरम्यान आलियाने यावर, 'मी प्रचंड आनंदी आहे. हा आनंद व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतील...' अशी प्रतिक्रिया दिली.

तर रणबीरने देखील भविष्याबद्दल स्वतःचं मत व्यक्त केलं, तो म्हणाला, 'हा काळ माझ्यासाठी खास आहे. मी माझ्या आयुष्यात प्रचंड आनंदी आहे. माझं आणि आलियाचं लग्न झालं आणि आम्हाला आमच्या आयुष्यातील आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर करायची होती.'  सध्या कपूर आणि भट्ट कुटुंब नव्या पाहुण्याच्या प्रतीक्षेत आहे. 

Read More