Marathi News> मनोरंजन
Advertisement

Confirm... रणबीर आलियाच्या लग्नाची तारीख ठरली, जवळच्या व्यक्तीकडून शिक्कामोर्तब

रणबीर आलियाच्या लग्नाच्या तारखेपासून ते लग्नाच्या ठिकाणापर्यंतची माहिती समोर आली आहे  

Confirm... रणबीर आलियाच्या लग्नाची तारीख ठरली, जवळच्या व्यक्तीकडून शिक्कामोर्तब

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरच्या लग्नाची चर्चा फक्त बॉलिवूडमध्येचं नाही तर, सर्वत्र तुफान रंगली आहे. आलिया आणि रणबीर 15 - 16 एप्रिल रोजी विवाह बंधनात अडकतील अशी बातमी समोर आली. पण आलिया - रणबीर 15-16 नाही तर, 13-14 एप्रिल रोजी सप्तपदी घेणार आहेत. ही माहिती आलियाचे काका  रॉबिन भट्ट यांनी दिली आहे. 

रॉबिन बट्ट हे महेश भट्ट यांचे भाऊ आहेत. एका वेबसाईटला त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, '13-14 एप्रिल रोजी लग्न करणार आहेत.'जेव्हा रॉबिन भट्टला विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले होते की, आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा लग्नाचा कार्यक्रम चार दिवस चालणार आहे. 

यावर रॉबिन म्हणाले की, तुम्ही आता माझ्यावर विश्वास ठेवा किंवा आधी जे बोललो त्यावर विश्वास ठेवा. 15 आणि 16 तारखेला काहीच नाही. लग्नाच्या तारखा निश्चित झाल्या आहेत. त्यानंतर पार्टी असेल...

दरम्यान, रोज त्यांच्या लग्नाबद्दल नवे अपडेट्स समोर येत असतात. काही दिवसांपूर्वी  या जोडप्याच्या लग्नाच्या तारखेपासून ते लग्नाच्या ठिकाणापर्यंतची माहिती समोर आली आहे. बॉम्बे टाइम्सच्या रिपोर्टनुसार, रणबीर कपूरने त्याच्या वास्तू बिल्डिंगमध्ये 8 दिवसांसाठी बँक्वेट हॉल बुक केला आहे.

आलिया आणि रणबीरने लग्नाची तयारी सुरू केली आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण एका साडी फॅशन ब्रँड आणि डिजायनरसोबत आलिया आणि रणबीरचा फोटो तुफान व्हायरल होत आहे.

Read More