Marathi News> मनोरंजन
Advertisement

रणबीर कपूर आणि आलिया भट बोहल्यावर चढणार?

 रणबीर आणि आलियाच्या अफेअरची सगळीकडेच चर्चा 

रणबीर कपूर आणि आलिया भट बोहल्यावर चढणार?

मुंबई : रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या अफेअरची सगळीकडेच चर्चा आहे. ही जोडी जानेवारी महिन्यात बोहल्यावर चढणार असल्याची चर्चा सध्या रंगते आहे. रणबीरच्या फॅमिलीलाही आलिया आवडली असून लवकरच या दोघांनी रेशीमगाठीत अडकावं अशी ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांची इच्छा आहे. त्यामुळेचं या जोडीने लग्न करण्य़ाचा निर्णय घेतल्याची चर्चा रंगते आहे.

आलिया आणि रणबीर एकमेकांना अनेक दिवसांपासून डेट करत आहेत. अनेकदा दोघेही एकत्र दिसले. आलिया सध्या रणबीरच्या कुटुंबासोबत देखील बराच वेळ घालवत आहेत. दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत. आलिया-रणबीरची जोडी 'ब्रम्हास्त्र' या चित्रपटात दिसणार आहे. पण त्याआधी दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

Read More