महेश भट्ट यांची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हीने अभिनय तसेच वेगवेगळ्या कार्पेटवर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पण आता तिची चर्चा आहे तिच्या व्यक्तीमत्त्वामुळे. आलिया भट्टने ड्रायव्हर आणि असिस्टंटला लाखोंची मदत केली होती. यावरून हे सिद्ध होते की आलिया एक चांगली व्यक्ती तसेच एक उत्तम अभिनेत्री आहे.
स्पॉटबॉय.कॉमच्या वृत्तानुसार, आलिया भट्टने २०१९ मध्ये तिचा ड्रायव्हर सुनील आणि घरकाम करणाऱ्या अमोलला प्रत्येकी ५० लाख रुपये भेट दिले जेणेकरून ते मुंबईत १ बीएचके घर खरेदी करू शकतील. आलिया त्यांना तिच्या कुटुंबाप्रमाणे वागवते. २०१२ मध्ये आलियाने 'स्टुडंट ऑफ द इयर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले तेव्हापासून दोघेही तिच्यासोबत आहेत.
सध्या, आलिया तिच्या आगामी 'अल्फा' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, ज्यामध्ये शर्वरी वाघ देखील आहे. हा चित्रपट २५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय, आलिया तिचा पती रणबीर कपूर आणि विकी कौशल यांच्यासोबत संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय, आलिया फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या चित्रपटात कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रा यांच्यासोबत दिसणार आहे.