Marathi News> मनोरंजन
Advertisement

Alia Bhatt च्या अतिशय जवळचा व्यक्ती रुग्णालयात दाखल

आलियाचं कुटुंब मोठ्या चिंतेत, खास व्यक्तीच्या प्रकृतीसाठी प्रर्थना...   

Alia Bhatt च्या अतिशय जवळचा व्यक्ती रुग्णालयात दाखल

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट काही दिवसांपासून 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमामुळे चर्चेत आहे. आलिया सध्या वाराणसीमध्ये 'ब्रह्मास्त्र' सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. शुटिंग सुरू असताना आलियाचं कुटुंब मात्र चिंतेत आहे. कारण आलियाच्या जवळचा व्यक्ती सध्या रुग्णालयात दाखल केलं. गेल्या 5 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे आलियाचं कुटुंबसध्ये मोठ्या चिंतेत आहेत. 

आलियाचे आजोबा नरेंद्र नाथ राजदान सध्या रुग्णालयात आहेत. इम्युनिटी कमी झाल्यामुळे  नरेंद्र नाथ राजदान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रिपोर्टनुसार सोनी राजदान यांच्या वडिलांना मुंबईतील एच.एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

fallbacks

दरम्यान, कही दिवसांपूर्वी आलियाने आजोबांचा वाढदिवस देखील साजरा केला. यावेळी अभिनेता रणबीर कपूर आणि त्याची आई नीतू कपूर आणि बहिण रिद्धिमा कपूर सहानी देखील पर्टीमध्ये उपस्थित होतं. 

आलियाने पार्टीचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर देखील पोस्ट केलं. सध्या भट्ट आणि राजदान कुटुंब नरेंद्र नाथ राजदान यांच्या प्रकृतीसाठी प्रर्थना करत आहेत. 

 

Read More