Marathi News> मनोरंजन
Advertisement

आलिया भट्टनं नवरा रणबीर कपूरची हेरगिरी केली? कपिल शर्माच्या शोमध्ये केला खुलासा

Alia Bhatt On Spying Over Ranbir Kapoor : आलिया भट्टनं कपिल शर्माच्या शोमध्ये नवरा रणबीर कपूरवर हेरगिरी करण्याविषयी खुलासा केला आहे. 

आलिया भट्टनं नवरा रणबीर कपूरची हेरगिरी केली? कपिल शर्माच्या शोमध्ये केला खुलासा

Alia Bhatt On Spying Over Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या 'जिगरा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेली आलिया भट्ट 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये पोहोचली होती. नेहमीप्रमाणेच जेव्हा सेलिब्रिटी या शोमध्ये हजेरी लावतात तेव्हा कपिल त्यांना त्यांच्या खासगी आयुष्यासंबंधीत अनेक प्रश्न विचारता दिसतो. यावेळी तर आलिया रणबीर कपूरची हेरगिरी करत होती की नाही याविषयी तिनं खुलासा केला आहे. 

आलिया या शोमध्ये चित्रपटाची टीम अर्थात दिग्दर्शक वसन बाला, करण जोहर आणि वेदांग रैना आणि तिची आई सोनी राजदानसोबत पोहोचली होती. कपिल शर्मानं शोमध्ये संपूर्ण टीमसोबत मजेशीर गप्पा मारल्या त्यानंतर तो आलियाच्या या चित्रपटाविषयी बोलताना म्हणाला, लग्नाच्या आधी तिनं स्पाय थ्रिलर राजीमध्ये स्पायची भूमिका साकारली होती आणि लग्नानंतर ती स्पाय थ्रिलर अल्फामध्ये दिसणार आहे. कपिलनं आलियाला विचारलं की 'आलिया, तुला काय वाटतं, मुली लग्नाच्या आधी किंवा लग्नानंतर हेरगिरी करण्यात हुशार असतात का? मी सरळ मुद्यावर येतो की तू कधी रणबीर कपूरची हेरगिरी केली आहेस का?' त्यावर उत्तर देत आलियानं सांगितलं की 'मला कधीच त्याच्यावर हेरगिरी करण्याची गरज भासली नाही.'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

इतकंच नाही तर शोमध्ये रणबीरची एक्स म्हणून ओळखली जाणारी डफ्ली (सुनील ग्रोवर)सोबत देखील आलिया मस्ती करताना दिसली. जेव्हा कपिल शर्मानं आलियाला डफ्लीची ओळख करून दिली तेव्हा डफ्लीला तिची इर्षा वाटू लागली आणि ती आलियाला म्हणाली, 'तर ही आलिया भट्ट आहे?' त्यावर डफ्लीची चूक सुधारत आलिया म्हणाली, 'आलिया भट्ट कपूर.'

हेही वाचा : पंकज त्रिपाठीच्या लेकीला नेटकऱ्यांनी समजलं श्रद्धा कपूर! VIDEO मुळे एकच चर्चा

दरम्यान, आलिया भट्टचा आगामी चित्रपट 'जिगरा' 11 हा ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. जिगरानंतर आलिया भट्ट ही 'अल्फा' आणि 'लव्ह अ‍ॅन्ड वॉर' सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तर रणबीर कपूर हा लवकरच नितेश तिवारीच्या 'रामायण' या चित्रपटात दिसणार आहे. त्याशिवाय तो आलियासोबत 'लव्ह अ‍ॅन्ड वॉर' आणि 'अ‍ॅनिमल पार्क' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Read More