Marathi News> मनोरंजन
Advertisement

गरोदरपणात Alia Bhatt चा 'तो' व्हिडीओ पाहताच आईला धक्का

गरोदर आलिया भट्टच्या 'त्या' व्हिडीओची सर्वत्र चर्चा, आईने पाहाताच मोठा धक्का  

गरोदरपणात Alia Bhatt चा 'तो' व्हिडीओ पाहताच आईला धक्का

मुंबई : अभिनेत्री आलिया (Alia Bhatt)ने प्रेग्नेंसीची घोषणा केल्यानंतर भट्ट आणि कपूर कुटुंबासोबतचं चाहत्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे. आलियाने आनंदाची बातमी दिल्यानंतर सोशल मीडियावर तिच्याबद्दल चर्चा रंगाताना दिसतात. आता देखील आलियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आलियाचा हा व्हिडीओ खुद्द आई सोनी राजदानने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. सध्या आलियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

व्हिडीओमध्ये आलिया आणि आई दिसत आहे. सोनी राजदान यांनी देखील अनेक सिनेमांमध्ये अभिनय करत आपल्या कर्तुत्वाची छाप उटवली. आईच्या पावलावर पाऊल ठेवत आलिया देखील यशाच्या उच्च शिखरावर पोहोचली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Soni Razdan (@sonirazdan)

सोनी राजदानने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडिओ 13 सेकंदांचा आहे. 13 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये सोनी राझदान यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखेची झलक दिसत आहे, तर आलियाच्या 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमातील काही सीन आहेत.

सोनी राजदाना यांनी व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये, 'व्हिडीओ पाहिल्यानंतर मला फार आनंद झाला. व्हिडीओ करण्यासाठी अधिक वेळ दिल्याबद्दल  धन्यवाद.' शिवाय ज्यांनी व्हिडीओ तयार केला त्यांचे सोनी यांनी आभार देखील मानले आहेत. 
 
आलिया भट्ट प्रेग्नेंसी

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आलिया भट्टने 27 जून रोजी प्रेग्नेंसीची घोषणा केली. या घोषणेनंतर सोनी राझदान यांनी सोशल मीडियावर आलिया आणि अभिनेता रणबीर कपूर यांचा फोटो शेअर करून त्याचं अभिनंदन केलं. 

 

Read More