Marathi News> मनोरंजन
Advertisement

प्रेग्नेंसीच्या वृत्तानंतर Alia Bhatt कडून नवीन फोटो शेअर, चाहते म्हणाले...

अभिनेत्री आलिया भट्टने ती गरोदर असल्याची बातमी शेअर केली होती.

प्रेग्नेंसीच्या वृत्तानंतर  Alia Bhatt कडून नवीन फोटो शेअर, चाहते म्हणाले...

मुंबई : बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरची पत्नी आणि अभिनेत्री आलिया भट्टने ती गरोदर असल्याची बातमी शेअर केली होती. या बातमीनंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यात आता आलिया भट्टने प्रेग्नेंसीनंतरचा तिचा पहिला फोटो शेअर केला आहे. या फोटोवर चाहते तुफान कमेंट करत आहेत.  

 रणबीर कपूर आणि आलिया भट्टने सोशल मीडियावर हॉस्पिटल मधला एक फोटो पोस्ट केला होता. हा फोटो शेअर करत तिने प्रेग्नेंट असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. या बातमीनंतर अनेकांनी तिला आई होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर सोशल मीडियावर देखील या दोघांचे अनोखे मीम्स बनले होते. एकूणच काय तर या वृत्ताची सर्वच ठिकाणी चर्चा होती.

आलियाने गरोदरपणाची बातमी तिच्या चाहत्यांसोबत शेअर केल्यापासून चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. तिच्या चाहत्यांची ही उत्सुकता पाहून आलियाने आज तिच्या इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक नवीन फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती खूप आनंदी दिसत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alia Bhatt  (@aliaabhatt)

दरम्यान आलियाच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. तर अनेक चाहते तिला गोड बातमी कधी देणार असे प्रश्न विचारत आहेत. 

Read More