मुंबई : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर 5 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर कायमचे लग्नबंधनात अडकले आहेत. गुरुवारी म्हणजेच 14 एप्रिल रोजी हे बॉलिवूडचं पॉवर कपल यांनी लग्न केलं. त्यांचं लग्न सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. दोघांच्या ही साध्या शैलीने सर्वांचीच मनं जिंकली आहेत.
या दोघांच्या जोडीला सर्वांनीच पसंती दर्शवली आहे. परंतु त्यांच्या चाहत्यांमध्ये लग्नातील प्रत्येक क्षणाची माहिती जाणून घेण्यात खूप उत्सुक्ता आहे. सध्या आलिया आणि रणबीरच्या लग्नाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्याची सर्वत्र चर्चा आहे.
लग्नसोहळ्यादरम्यान रणबीर कपूरने कुटुंबातील सर्व सदस्यांसमोर असे काही केले जे, पाहून आलियाला धक्का बसला.
रणबीर आपली प्रेयसी आलिया भट्टकडून हार घालण्यासाठी गुडघ्यावर खाली बसला. रणबीरला असं पाहून आलियाला धक्काच बसला आणि खूप आनंद झाला. यानंतर आलियाने रणबीर कपूरला हार घातला.
from being so shy and reserved to kissing her whenever he gets a chance, picking her up bridal style, going down on his knees for varmala and the "say hi to my wife"
— aloobir ftw. I KKR (@srksfp) April 15, 2022
Ranbir Kapoor, you are so whipped #RanbirAliaWedding pic.twitter.com/cMtJqIamfz
आलियाने रणबीर कपूरला पुष्पहार घालताच रणबीर आणि आलिया खूपच भावूक झाले. यानंतर रणबीरने कुटुंबातील सर्व सदस्यांसमोर आलियाला किस केलं.
या दोघांमधील हे क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.